एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी चिंचवडमधील या पाट्यांचं गूढ काय?
पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरात 'Shivde, I Am Sorry' अशा आशयाचे फलक सध्या झळकत आहेत.
पुणे : 'पुणेरी पाट्यां'च्या खमंग चर्चा केवळ शहरात, जिल्ह्यात, राज्यात, देशातच नव्हे तर अगदी परदेशातही रंगतात. याच पुणेरी पाट्यांचं लोण आता पिंपरी चिंचवडमध्ये येऊन पोहचलंय. पिंपरी चिंचवडच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरात 'Shivde, I Am Sorry' अशा आशयाचे फलक सध्या झळकत आहेत.
रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या विजेच्या खांबावर हे फलक नेमके कोणी आणि का लावले? यावर शहरभर चर्चांना ऊत आलाय. 'शिवडे, आय एम सॉरी' हे वाचताच एखाद्या प्रियकराचे प्रेयसी सोबत खटके उडाल्याने, तो तिची अशा पद्धतीने मनधरणी करत असावा, इथपर्यंतच्या निष्कर्षावर ही चर्चा येऊन ठेपली आहे.
पुण्यात एखाद्याला सूचित करणाऱ्या, शालजोडे लगावणाऱ्या, इतकंच काय तर राजकीय आखाड्यातही पुणेरी पाट्या दिसून येतात. तसेच एखाद्या प्रोजेक्टचे लॉंचिंग करायचे असल्यास, अशा पाट्यांची शक्कल लढवली जाते. जेणेकरून यातून ग्राहकाच्या मनात तो प्रोजेक्ट बिंबायला हवा.
असाच काहीसा प्रयत्न 'शिवडे, आय एम सॉरी' या पाट्यांमधून करण्याचा प्रयत्न असू शकतो. मात्र हे कोण करतंय? याचा शोध अगदी पिंपरी चिंचवड पोलिसांपासून महापालिका ही घेऊ लागली आहे. तपासातून या मागचं गूढ समोर येईलच पण सध्या या पाट्या पाहून पिंपरी चिंचवडकरांना पुण्यात राहत असल्याचा भास होतोय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement