शालेय विद्यार्थ्यांचा 10 टक्के अभ्यासक्रम कमी होणार : प्रकाश जावडेकर
पहिली, दुसरीचा घरचा अभ्यासही रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पुस्तकांची संख्या कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. खेळ आणि साहित्यिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या हेतूनं निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी म्हटलं.
पुणे : विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा वाढता भार कमी करण्यासाठी 10 टक्के अभ्यासक्रम कमी केला जाणार आहे. सरकारने तसे आदेश दिल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पुण्यातील लवळे येथील मालपाणी ग्रुपच्या ध्रूव या शाळेचं उद्घाटनप्रसंगी जावडेकर बोलत होते.
शालेय अभ्यासक्रम दहा टक्के कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तर पुढील वर्षी 20 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या काळात टप्याटप्याने हा अभ्यासक्रम कमी केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
पहिली, दुसरीचा घरचा अभ्यासही रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. पुस्तकांची संख्या कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. खेळ आणि साहित्यिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, या हेतूनं निर्णय घेण्यात आल्याचं जावडेकरांनी म्हटलं.
अभ्याक्रमात मुलांनी न गुंतता त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी, याकरता देशातील शाळांना पाच हजारापासून खेळाचे सामान खरेदी करण्याकरता आर्थिक तरतुद केली आहे. त्यासाठीची आर्थिक मदत सर्व शाळांना दिली जाणार आहे. पुस्तकांची संख्या कमी केली जाईल असही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.