(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satish Govekar: पुण्यातील नयना पुजारी प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकलेल्या सतीश गोवेकर यांचा राष्ट्रपती पदकाने गौरव
Satish Govekar: गुन्हेगारांमध्ये आपला दबदबा असलेल्या गोवेकर (Satish Govekar) यांनी त्यांच्या सेवेच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.
Satish Govekar: पुण्यासह देशाला हादरवून सोडलेल्या नयना पुजारी (Nayana Pujari rape-murder case) (वय २६) प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकलेल्या सतीश रघुवीर गोवेकर (Satish Govekar) यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे.गुन्हेगारांमध्ये आपला दबदबा असलेल्या गोवेकर (Satish Govekar) यांनी त्यांच्या सेवेच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे.
गोवेकरांनी बहुचर्चित नयना पूजारी खून प्रकरणातील (Nayana Pujari rape-murder case) ससून रुग्णालयातून फरार झालेल्या आरोपींना अटक केली होती. त्याचबरोबर नुसतंच समोर आलेलं, ललित पाटील ड्रग प्रकरणात देखील त्यांनी चांगली कामगिरी करत आरोपींचा पर्दाफाश करीत त्यांना अटक करण्यात कामगिरी बजावली आहे. गोवेकर हे 1988 बॅचचे पोलिस अधिकारी आहेत. त्यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवा आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे सुपुत्र असलेले पुण्यातील सहायक आयुक्तपदी कार्यरत असलेले सतीश रघुवीर गोवेकर यांना बुधवारी राष्ट्रपतींचे पोलिस पदक घोषित करण्यात आले आहे. त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदावर सरळसेवेतून नियुक्ती झाली. त्यानंतर 2007 मध्ये निरीक्षक पदावर पदोन्नती झाली. त्यांनी पुणे शहर येथे गुन्हे शाखा, दत्तवाडी पोलिस ठाणे, कोंढवा पोलिस ठाण्यात आणि मुंबई शहर गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण, कामाठी पोलिस ठाणे, नागपूर ग्रामीण या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे. 2017 मध्ये त्यांची सहायक आयुक्त पदावर नेमणुक झाली.
राज्य गुन्हे अन्वेषण विभाग नवी मुंबई, पुणे शहर फरासखाना विभाग आणि सध्या गुन्हे शाखा पुणे येथे कर्तव्य बजावत आहेत. सतीश रघुवीर गोवेकर (Satish Govekar) यांना आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारची 503 बक्षिसे मिळाली आहेत. पुण्यासह देशाला हादरवून सोडलेल्या नयना पुजारी (Nayana Pujari rape-murder case) प्रकरणात पळून गेलेला व नंतर पंजाब, दिल्ली येथे नाव बदलून राहणाऱ्या आरोपीला त्यांनी बेड्या ठोकल्या होत्या. वैशिष्ट्यपूर्ण सेवा व उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांची पोलिस दलातील सेवा 31 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण होत आहे.