एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नयना पुजारी बलात्कार-हत्या प्रकरणी आरोपी योगेश कसा अडकला?
पुणे : योगेश राऊत... थंड डोक्याचा हत्यारा... नयना पुजारीचा मारेकरी.. पण या थंड डोक्याच्या मारेकऱ्यानं केलेलं कृत्य तितकंच घृणास्पद आहे..
योगेश राऊत हा मूळचा खेड तालुक्यातल्या गोळेगावचा... मोठमोठ्या आयटी कंपन्यांना लागणाऱ्या गाड्यांवर हा ड्रायव्हर होता. नयना काम करत असलेल्या सिनिक्रॉन कंपनीतही तो गाडी चालवायचा.
'त्या' दिवशी नयना कंपनीतून बाहेर पडली, तेव्हा योगेशने नयनाला लिफ्ट ऑफर केली. रोजच्याच गाडीवरचा ड्रायव्हर असल्याने नयनानेही होकार दिला आणि तिथेच नयनाचं चुकलं.
योगेश राऊतनं नयनाला लिफ्ट दिली, तेव्हा राजू चौधरी आणि महेश ठाकुर हे दोघेही गाडीत होते. मित्राला सोडण्याच्या बहाण्यानं त्यांनी गाडी वाघोलीकडे नेली. तिथे विश्वास कदमला सोबत घेतलं. नयनाला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
नयना पुजारी बलात्कार आणि हत्या, दोषींना शिक्षेची सुनावणी
नयना अर्धमेली झालेली असताना या चौघांनीही तिच्याकडचे दागिने हिसाकवले. एटीएम कार्ड काढून घेतलं आणि खराडीतल्या एका एटीएममधून पैसे काढले. सर्वात शेवटी गाडीतच तिची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर ओळख पटू नये यासाठी योगेशनं तिचा चेहरा विद्रूप केला आणि राजगुरुनगरमध्ये फेकून दिला. दुसरीकडे नयना बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केलेल्या पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला. तिथेच नयनाची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांच्या तपासाची चक्रं फिरली. ड्रायव्हरच्या झडत्या झाल्या. कॉल डीटेल्स तपासले गेले आणि त्यात योगेश राऊतचं नाव समोर आलं. पोलिसांनी योगेश राऊतसह त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली आणि सुरु झाला नयना पुजारी हत्याकांडाचा खटला. अटकेच्या दीड वर्षांनंतरच या प्रकरणात एक नाट्यमय वळण आलं. आजाराच्या बहाण्याने योगेश रुग्णालयात भर्ती झाला. त्याला भेटण्याच्या बहाण्यानं भावानं त्याला 4 हजार रुपये दिले आणि त्याचवेळी योगेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन गायब झाला. योगेश हडपसरवरुन दौंडला गेला. दौंडहून रेल्वेनं सुरतला गेला. सुरतहून त्याने दिल्ली गाठली आणि दिल्लीहून त्यानं अमृतसरमध्ये प्रवेश केला. काही दिवस तो एका गुरुद्वाऱ्यात राहिला. तिथं सेवक म्हणून काम केलं. तिथं त्यानं रवी भल्ला हे नवं नाव धारण केलं. मित्रांच्या मदतीने त्याने ड्रायव्हिंग लायसन्स काढलं. पॅन कार्ड काढलं आणि काही दिवसांनी तो दिल्लीत सेटल झाला. पण परिवाराला भेटण्याची त्याची इच्छा त्याच्या पायातली बेडी ठरली. योगेश अधूनमधून वेशांतर करुन घरी यायचा. पोलिस त्याच्या औंधमधल्या घरावर पाळत ठेऊन होतेच. दोन वेळा एक अनोळखी इसम येऊन गेल्यानं तो पोलिसांच्या रडारवर आला. पोलीस थेट दिल्लीत पोहोचले आणि तिथं जाऊन हा योगेशच असल्याची खातरजमा झाली. एकीकडे निर्भया प्रकरणामुळे पोलिसांवर दबाव वाढत होता. पण त्याचवेळी एके दिवशी योगेश आपल्या पत्नीला भेटण्यासाठी शिर्डीला येणार असल्याची टीप पोलिसांना मिळाली आणि योगेश पोलिसांच्या जाळ्यात आला. दीड वर्षांच्या लपंडावानंतर योगेश सापडला पण त्याच्या याच दीड वर्षांमुळे नयनाला मिळणारा न्याय आणखी लांबला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement