Raj Thackeray : काल महाआरती, आज पत्रकार परिषद! 'भोंग्यां'वरुन जोरदार टीकेनंतर राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
Raj Thackeray Pune News : हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे. आज राज ठाकरे त्याला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे.
Raj Thackeray Speech In Pune : राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.. काल हनुमान आरतीवरून आणि राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून जोरदार टीका होत आहे. आज राज ठाकरे त्याला काय उत्तर देणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांची पुण्यात पत्रकार परिषद आहे. कालच संजय राऊतांनी राज ठाकरे यांना 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं संबोधत त्यांच्यावर टीका केली होती. तसंच गहमंत्र्यांनीही राज ठाकरेंच्या अल्टिमेटमला केराची टोपली दाखवत मशिंदींवरील भोंगे उतरवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देणार, पुढील भूमिका काय असेल या प्रश्नांचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त महाआरती केली. यावेळी राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. या महाआरतीला पुण्यातील मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी भगवी शाल आणि गदा देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले. शिवाय ढोलताशांच्या गजरात राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं होतं.
मशिदीवरील भोंगे हटवले नाहित तर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. अखेर काल हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील खालकर चौकातील मारूती मंदिरात महाआरती झाली. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात पोहोचले आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या या महाआरतीनिमित्त पुण्यात मनसैनिकांनी राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करत पोस्टरबाजी केल्यानं चर्चा झाली होती. गुढीपाडव्यानिमित्त मुंबई आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तर सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज ते काय बोलणार याकडे लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या