(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : "राज ठाकरे हे महाराष्ट्राचे ओवेसी", लाऊडस्पीकरच्या वादावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया
Sanjay Raut : मशिदीत लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण आता चांगलेच तापले आहे.
Sanjay Raut : मशिदीत लाऊडस्पीकरबाबत महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण आता चांगलेच तापले आहे. लाऊडस्पीकर-अजान वादावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे महाराष्ट्राचे ओवेसी असे वर्णन केले आहे. संजय राऊत यांनी लाऊडस्पीकरच्या वादावर बोलताना आधी भाजपवर हल्लाबोल केला आणि नंतर राज ठाकरे हे भाजपसाठी महाराष्ट्राचे ओवेसी असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केलीय.
राऊतांच्या वक्तव्यानंतर पोस्टर 'सामना'
संजय राऊत पुढे म्हणाले की, एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी उत्तर प्रदेशात जे काम केले, ते काम भाजपला राज ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात करून दाखवायचे आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर पोस्टर पाहायला मिळाले. या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, 'तुम्ही ओवेसी कोणाला बोलला? संजय राऊत, आधी तुम्ही तुमचा लाऊडस्पीकर बंद करा. मिळालेल्या माहितीनुसार, हे पोस्टर मनसेने लावले आहे की दुसरे कोणी? याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
Mumbai:Poster that reads "Whom did you call Owaisi? Sanjay Raut shut down your loudspeaker,whole Maharashtra facing problem due to it or else we'll shut down your loudspeaker in MNS style" seen outside Saamana Office
— ANI (@ANI) April 16, 2022
Raut reportedly called Raj Thackeray 'Maharashtra ka Owaisi' pic.twitter.com/qMurBPmC0Y
पुणे शहरात हनुमान चालिसा पाठ
मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले आहेत. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेचे राज्याच्या राजकारणावर उमटलेले पडसाद अजूनही विरलेले नाहीत. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा, अन्यथा देशभरात हनुमान चालिसा लावणार, या भूमिकेवर राज ठाकरे ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मशिदींवरील भोंग्यावरुन मनसे आणि भाजपला आव्हान देणाऱ्या वादग्रस्त PFI ही संघटनेचा इतिहास माहिती आहे का?
Raj Thackeray : राज ठाकरे पुण्यात, मारुती चौकात महाआरती; काय बोलणार याकडे लक्ष