Sanjay Kakade : मनसेशी युती करुन भाजपचा फायदा नाही, संजय काकडे यांचे वक्तव्य
Sanjay Kakade : आपण सत्ताधाऱ्यांना विकासकामावर प्रश्न विचारायला हवेत. हनूमान चिलासा म्हणून काहीही होणार नाही. राज ठाकरे यांनी विकासकामावर, नोकऱ्यावर बोलायला हवं, असे भाजप खासदार संजय काकडे म्हणाले.
Sanjay Kakade : हनुमान आणि राम यांना जगातील सर्वच लोक मानतात. आता हा विषय काढण्याचा विषय नव्हता. राज ठाकरे विरोधी पक्षात आहेत. सत्ताधारी पक्षात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या सत्ताधारी पक्षाने काय केले? हे मुद्दे मांडायला हवं. राज ठाकरेंनीही तेच मुद्दे मांडायला हवे होते. हॉस्पिटल, शाळा, रस्ते, नोकरी अथवा इतर विकासकामाचे प्रश्न राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारायला हवेत. हे करायचं सोडून हनुमानाच्या मंदिरात जाऊन आरती करुन सर्वांचा वेळ घालवायचा. आरती करणारे आरती करतातच. पण आपण सत्ताधाऱ्यांना विकासकामावर प्रश्न विचारायला हवेत. हनूमान चिलासा म्हणून काहीही होणार नाही. राज ठाकरे यांनी विकासकामावर, नोकऱ्यावर बोलायला हवं, असे भाजप नेते संजय काकडे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
हनुमान चालिसा लावून अथवा भोंगे लावून नोकऱ्या मिळणार आहेत का? लोकांचे प्रश्न मिटणार आहेत का? असा प्रश्न संजय काकडे यांनी राज ठाकरेंना विचारला. राज ठाकरेंशी युती करुन भाजपचा फायदा होणार नाही, असेही संजय काकडे यावेळी म्हणाले. राज्यात विकासावर कुणीच बोलत नाही, हे दुर्दैव्य आहे, असे संजय काकडे यावेळी म्हणाले. मशिदीवरचे भोंगे काढा हे भाजपचं धोरण नाही, हे वक्तीचं धोरण आहे, असे संजय काकडे म्हणाले. राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिरात महाआरती आणि सामूहिक हनुमान चालिसाचे पठन होणार आहे. मात्र, आरती आणि हनुमान चालिसा वाचून कार्यकर्ते आणि जनतेचा वेळ वाया घालवणे योग्य नसल्याचे काकडे म्हणाले. अशा कार्यक्रमांमुळे पोलीस आणि सामन्य नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. यावेळी त्यांनी हनुमान चालिसा वाचून किंवा भोंगे काढून नोकऱ्या मिळणार आहेत का?
जिथे लोकांना त्रास होतो, तेथील मशिदीवरील भोंगे काढा असे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे, माझेही तेच म्हणणं आहे. कदाचीत भाजपचेही तसेच असेल. मशिदीवरील भोंग्याचा त्रास होतो म्हणून हनुमान चालिसा लावणं गरजेचं नाही, असे वक्तव्य संजय काकडे यांनी केले आहे. हनुमान चालिसा लावून काहीही होणार नाही. विकास कामावर बोललं पाहिजे, नोकऱ्यावर बोललं पाहिजे... विरोधक म्हणून हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारायला हवेत, असा टोला काकडे यांनी राज ठाकरे यांना लगावला. कोल्हापुरात भाजपचा पराभव होणार, हे नक्कीच होतं. कारण तीन पक्ष एका पक्षाविरोधात मैदानात उतरले होते. त्यामुळे भाजपचा पराभव झाला, असेही काकडे म्हणाले.