कसबा पेठ मेट्रो स्टेशनला पुणेकरांचा विरोध, स्थानिक नागरिकांचं आंदोलन
पुणे शहराच्या मध्यभागातील कसबा पेठमध्ये मेट्रोचं स्टेशन होणार आहे. मात्र याठिकाणी मेट्रो स्टेशनला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यासाठी स्थानिक नागरिकांना आज आंदोलनही केलं.

पुणे : पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या मेट्रोचं काम जोरात सुरु आहे. पिंपरी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र या मेट्रोला कसबा पेठेतील रहिवाशांनी विरोध केला आहे.
पुणे शहराच्या मध्यभागातील कसबा पेठमध्ये मेट्रोचं स्टेशन होणार आहे. मात्र याठिकाणी मेट्रो स्टेशनला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. यासाठी स्थानिक नागरिकांना आज आंदोलनही केलं. स्टेशन होऊ देणार नाही, या मागणीसाठी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरासमोर आज स्थानिक नागरिकांनी आंदोलन केलं.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात कसबा पेठेत मेट्रोचे स्टेशन होत आहे. यामध्ये 200 ते 300 कुंटुंबांना स्थलांतरित व्हावं लागणार आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याचा सर्व्हे केला असून या स्टेशनमुळे येथील ऐतिहासिक स्थळांना धक्का लागणार असून स्थानिक कुटुंबांनाही फटका बसणार आहे. या सर्व अडचणींमुळे याठिकाणी मेट्रो स्टेशन होऊन नये भूमिका येथील नागरिकांनी घेतली आहे.
व्हिडीओ -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
