एक्स्प्लोर
पुणे पालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू
पुण्यात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

पुणे : मित्रांसोबत जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पुण्यातील दत्तवाडीत राहणाऱ्या प्रफुल्ल भीमराव वानखेडेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रफुल्ल मित्रांसोबत तळजाई टेकडीवरील पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला होता. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. मदतीसाठी त्याने आवाजही दिला, मात्र स्विमिंग पूलवर कुणीही नसल्यामुळे तो बुडाल्याचं म्हटलं जात आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला तलावातून बाहेर काढण्यात आलं, मात्र रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आलं.
आणखी वाचा























