एक्स्प्लोर
पतंगाच्या मांजामुळे गळा कापून पुण्यात महिलेचा मृत्यू
मांजामुळे गळा कापल्यामुळे सकाळ वृत्तपत्राच्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार बुधवारी गंभीर जखमी झाल्या होत्या.
पुणे : मांजाने गळा कापला गेल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पुण्यातील महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 'सकाळ' वृत्तपत्रातील जाहिरात आणि मार्केटिंग विभागातील कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचं रविवारी सकाळी खाजगी रुग्णालयात निधन झालं.
पतंगाच्या मांजामुळे पक्षी जखमी झाल्याचं ऐकायला मिळतं. मात्र आता हा मांजा माणसांच्याही जीवावर उठल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत. मांजामुळे गळा कापल्यामुळे सुवर्णा मुजुमदार बुधवारी गंभीर जखमी झाल्या होत्या. विशेष म्हणजे पतंगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला आहे.
सुवर्णा बुधवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरुन दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी त्यांच्या गळ्याभोवती चिनी मांजा गुंडाळला जाऊन त्यांचा गळा कापला गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुणे महापालिकेसह पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही पतंग उडवण्यासाठी मांजा वापरला जातो. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असूनही शहरातील दुकानांमध्ये सर्रास या मांजाची विक्री केली जाते. परिणामी या मांजामुळे अनेक गंभीर अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
बीड
Advertisement