एक्स्प्लोर

Pune Rain : पुण्यात पावसाचा हाहा:कार, झेड ब्रिजखालच्या पुलाच्या वाडीत अनर्थ घडला, अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा वीजेचा करंट लागून मृत्यू

Pune Rain Update : पुण्यात तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी परिसरात घडली आहे. 

पुणे : जिल्ह्यात पावसाचा (Pune Rain) हाहाकार पाहायला मिळत आहे. सिंहगड रोड (Sinhgad Road) परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक (Electric Shock) लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी (Pulachi Wadi) परिसरात घडली आहे. 

पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या पाण्यात अनेक लोक अडकलेले आहेत. त्यातच आता पुलाची वाडी परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. 

अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा शॉक लागल्याने अंत

रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज (Bhide Bridge) परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

प्रशासनाचा ढिसाळ कारभार

याबाबत नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असूनदेखील त्या परिसरातील लाईट सुरु होत्या. प्रशासनाने तेथील लाईट बंद करणे अपेक्षित होते. रात्रीतून कधीच पाण्याचा विसर्ग केला जात नाही. सकाळी विसर्ग केला जातो. परिसरातील तीन मुले आपला स्टॉल वाहून जाईल या भीतीपोटी स्टॉल वाचवण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाचा ढिसाळ कारभार सुरु आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुणेकरांनो सावधान! आज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : बारामतीमधून माघार, पण आमचा कुणालाही पाठिंबा नाही; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका, भाजपवर टीका
बारामतीमधून माघार, पण आमचा कुणालाही पाठिंबा नाही; काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची भूमिका, भाजपवर टीका
Pune Crime News: पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी
पुण्यातील 'रील स्टार' सोनाली हिंगे अन् दोन पोलिसांचे अखेर निलंबन, प्राचार्यांकडून उकळली होती सात लाखांची खंडणी
Chhagan Bhujbal Helicopter Pune: छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक, पुण्यात अपघात थोडक्यात टळला
छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक, पुण्यात अपघात थोडक्यात टळला
Pune Crime News: कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन नको ते केलं, पुण्यातील संतापजनक प्रकार
कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयचा काळा कारनामा, आठवीतल्या मुलाला स्टोअर रूममध्ये नेऊन नको ते केलं, पुण्यातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget