![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Historical Places in Pune : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह या पाच वास्तू आता दत्तक घेता येणार; काय आहे योजना जाणून घ्या सविस्तर
Historical Places in Pune : केंद्रीय पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत नवी योजना तयारी केली आहे. या योजनेंतर्गंत आता पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसास्थळे दत्तक घेता येणार आहेत.
![Historical Places in Pune : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह या पाच वास्तू आता दत्तक घेता येणार; काय आहे योजना जाणून घ्या सविस्तर pune News now u can adopt shaniwar wada aga khan palace karla bhaja caves including 5 places Know what the scheme is in detail Historical Places in Pune : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा, आगाखान पॅलेससह या पाच वास्तू आता दत्तक घेता येणार; काय आहे योजना जाणून घ्या सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/99f135ea43fd84dc4c9c46299f8488ff1723616840508442_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Historical Places in Pune : पुणे शहर अनेक महत्त्वाच्या गोष्टींनी समृध्द आहे. पुण्याला शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकीय, सामाजिक वारसा लाभलेला आहे, अनेक मोठ्या आणि ऐतिहासिक वास्तू (Historical Places in Pune) देखील पुण्यात आहेत. त्या मोठ्या वास्तू बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता आपल्याला पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यासह, आगाखान पॅलेस यासारख्या मोठ्या वास्तू (Historical Places in Pune) आता दत्तक देण्यात येणार आहेत.
केंद्रीय पुरातत्व खात्याने ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत नवी योजना तयारी केली आहे. या योजनेंतर्गंत आता पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसास्थळे (Historical Places in Pune) दत्तक घेता येणार आहेत. पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून “ऍडॉप्ट अ हेरिटेज” ही खास योजना तयार करण्यात आली आहे.
पुण्यातील कोणत्या वास्तू घेता येणार दत्तक?
1 शनिवारवाडा
2 आगाखान पॅलेस
3 पाताळेश्वर लेणी
4 लोहगड
5 कार्ला लेणी आणि भाजे लेणी
पुण्यातील या प्राचीन पुणेकरांना आवडणाऱ्या पाच मोठ्या वास्तू आता तुम्हाला दत्तक घेता येणार आहेत. केंद्र सरकारच्या “ऍडॉप्ट अ हेरिटेज” या योजनेच्या अंतर्गत आता तुम्हाला किंवा तुमच्या संस्थेमार्फत पुण्यातील पाच प्राचीन वास्तुंचं (Historical Places in Pune) संवर्धन करु शकता येणार आहे. शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेणी, कार्ला-भाजे लेणी आणि लोहगड या पाच प्राचीन स्थळांचं संवर्धन करण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाने निवड केली आहे. त्यामुळे आता या पाचही स्थळं दत्तक घेता येणार आहे.
केंद्र सरकारच्या या योजने अंतर्गत या पाचही स्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता या पाच प्राचीन स्थळांच्या संवर्धनासाठी देशपातळीवरील संस्था सरसावल्या आहेत. सध्या केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित 3696 देशातील विविध वारसा स्थळे आहेत. यात प्राचीन मंदिरं, स्मारकं आणि ऐतिहासिक वास्तुंचा (Historical Places in Pune) समावेश आहे. आतापर्यंत देशात काही कंपन्यांनी 66 वारसा स्थळं दत्तक घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)