एक्स्प्लोर
Advertisement
भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर पुण्यात गुन्हा
संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम 420, 406, 465, 467, 468 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
पुणे : प्रसिद्ध उद्योजक आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून देण्यात आलेली सतरा एकर जमीन बेकायदा बळकावल्याचा आरोप काकडेंवर आहे.
संजय काकडेंसह सूर्यकांत काकडे, अशोक यादव आणि एकावर कलम 420, 406, 465, 467, 468 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरा पुण्यातील वारजे पोलिस स्टेशनमधे गुन्हा नोंदवण्यात आला.
पुण्यातील न्यू कोपरे गावाच्या पुनर्वसनासाठी सरकारकडून सतरा एकर जमीन देण्यात आली होती. ही जमीन अवैधरित्या बळकावल्याच्या आरोप काकडेंसह चौघांवर आहे. न्यू कोपरे गावचे ग्रामस्थ दिलीप मोरे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.
भूखंड बळकावणाऱ्या खासदार संजय काकडेंच्या भावाला कोर्टाचा दणका
खासदार संजय काकडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आपला संपूर्ण व्यवहार स्वच्छ असून आपल्या बदनामीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचा दावा काकडेंनी केला आहे. आपण पोलिसांना या प्रकरणात तपासासाठी सर्व ते सहकार्य करु असं खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात पुणे सत्र न्यायालयाने संजय काकडे यांचे भाऊ सूर्यकांत काकडे यांना दणका दिला होता. बळकावलेला 9 एकराचा भूखंड पालिकेच्या ताब्यात परत देण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement