एक्स्प्लोर

Pune Crime News: नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; विदेशी तरुणीसह तीन तरुणींची सुटका

सिंहगड रोडवरील नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. यात वेश्या व्यवसाय करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली.

Pune Crime News: सिंहगड रोडवरील नांदेड सिटीतील स्पा सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला आहे. यात वेश्या व्यवसाय करणा-या एक परदेशी व दोन स्थानिक तरुणींची सुटका केली. सेंटर मॉलमधील ब्लु बेरी स्पा मसाज असं या स्पा सेंटरचं नाव आहे. या प्रकरणी चार जणांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

मसाज सेंटरचे मालक मुंजा रामदास शिंदे (वय 31 रा.वडगाव ता.हवेली जि.पुणे), व्यवस्थापक योगेश पवार (रा.नांदेड गाव ता.हवेली जि.पुणे ), अथर्व प्रशांत उभे (वय 19 रा.धायरी, बेनकरवस्ती ता.हवेली जि.पुणे) व महिला व्यवस्थापक ज्योती विपुल वाळींबे (वय ३० रा.न-हे, ता.हवेली जि.पुणे) या चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली हा अनुचित प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार बनावट गिऱ्हाईक पाठवून या सगळ्या प्रकाराची पोलिसांनी खात्री करुन घेतली. त्याच सेंटरमध्ये अधिकच्या सेवेच्या नावाखाली  हा व्यावसाय सुरु आहे, अशी पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दुपारच्या सुमारास छापा टाकला.  यात मालक, दोन व्यवस्थापक आणि दोन पिडीत तरुणी सापडल्या. यात प्रकरणी सापडलेल्या 3 पिडीत तरुणींना महिला सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे आणि मालक व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे. 

छाप्यांच्या प्रमाणात वाढ 
स्पा सेंटरच्या छाप्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनुचित प्रकार आढळल्यास पोलीस सापळा रचून थेट कारवाई करत आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक अशा अवैध कारभारांना वचक बसताना दिसतो आहे. अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी अनेकदा आम्ही पुढाकार घेतो. त्यामुळे महिन्यात किमान 2 अशा स्पा सेंटरवर छापा मारण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

विमान नगरमध्येही घडला होता असा प्रकार
पुण्यातील अनेक स्पा सेंटरवर अशा प्रकारचा अवैध वेश्या व्यवसाय सुरु असतो. त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यापुर्वी  पुण्यातील विमाननगर भागात मसाज सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना अटक करण्यात आली होती. 'जस्ट डायल'वर विमाननगर परिसरातील मसाज पार्लरबाबत  माहिती उपलब्ध होती.स्पा सेंटरमधील कामगारांकडून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जात होता. त्यानंतर त्याला ग्राहक बनवून मसाजच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळल्या जात होते. जास्त पैसे उकळून वेश्याव्यवसाय केला जात होता, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आली आहे.

 

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
Baramati News: “जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
“जरा बारामतीकडेही लक्ष द्या!”, दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र, समस्याही मांडल्या
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget