Video: पुण्यातील कोयता गँगचा पोलिसांसमोरच उच्छाद, दोन गटात झालेल्या वादातून हल्ला; वडगावशेरीमधली घटना
Pune Crime : पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्री ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला केला आहे. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे.
Pune Crime : पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी (Pune Crime News) घटनांमुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी गाड्यांची तोडफोड करण्यासाठी, कधी दोन गटातील राड्यासाठी तर कधी एकतर्फी प्रेमासाठी कोयता उगारला (Koyata Gang) जातोय. पुण्यातील कोयता गँगचा पुन्हा धुडगूस घालणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांसमोरच कोयता गँगने उच्छाद मांडला आहे. त्यामुळे शहरात पोलिसांचा (Pune Police) धाक कमी होतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्री ही घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला केला आहे. दोन गटात झालेल्या गँगवॉरमुळे स्थानिकामध्ये दहशतीच वातावरण निर्माण झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकार ज्यावेळी घडला त्यावेळी महिला पोलीस अधिकारी तिथे उपस्थित होती. मात्र पोलिसांना न जुमनता कोयता गँगने दुसऱ्या गटातील तरूणावर कोयत्याने वार केले आहेत.एकीकडे पोलीस आयुक्त रितेश कुमार गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करत असताना ही गुन्हेगारांचां उच्छाद कायम आहे.
पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार जुन्या भांडणाचा राग मनात धरुन या तरुणांनी कोयत्याने खुनी हल्ला केल्याची माहिती आहे. किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत एका गटाने काल रात्री दुसऱ्या गटावर हल्ला केला. हल्ल्यात दोन ते तीन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातात कोयते ह घेऊन जोरजोरातून हल्ला करुन परिसरात दहशत माजवत कोयता टोळीने हल्ला केला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.
पुण्यात कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक भाई आणि त्यांच्या टोळ्या तयार होताना दिसतायत. वय अवघे 18- 25 , अंगावर एखादा टी शर्ट टाकायचा, फाटलेली पँट घालायची, खिशात रुमाल, तोंडावर मास्क आणि हातात कोयता अशी ओळख या नवीन भाई लोकांची तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यात नव्या भाईगिरीचा उदय झाला आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळतोय.
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :