गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुणे हादरले, कोंढव्यात भररस्त्यात वाळू व्यावसायिकावर तीन गोळ्या झाडल्या
पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर एकच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हा हल्ला पूर्व वैमानस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
![गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुणे हादरले, कोंढव्यात भररस्त्यात वाळू व्यावसायिकावर तीन गोळ्या झाडल्या Pune Crime Ganpati Vasarjan Firing on a sand businessman in Kondhwa Marathi News गणपती विसर्जनाच्या आदल्या दिवशी पुणे हादरले, कोंढव्यात भररस्त्यात वाळू व्यावसायिकावर तीन गोळ्या झाडल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/16/8100431ac4499f09ddc040750114630b172647748898689_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) तोंडावर झालेल्या गोळीबाराच्या (Pune Fire) घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे.शहरामध्ये गणपती उत्सवाची धामधूम सुरू असतानाच वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे. हा हल्ला पूर्व वैमन्यासातून झाला असल्याच प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील साळवे नगर येथे वाळू व्यावसायिकावर एकच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. हा हल्ला पूर्व वैमानस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप गायकवाड असे वाळू सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. कोंढव्यातील साळवे गार्डन समोर गोळीबााराची घटना घडली आहे. गायकवाड यांच्या गाडीवर आलेल्या अज्ञात तरुणांनी वरती दोन ते तीन गोळ्या झाडल्या आहेत. तरुणांची ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून करण्यात येत असून यामध्ये पोलिसांना यश आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात देखील घेतला आहे. दिलीप गायकवाड गोळीबारात जखमी झालेल्या वाळू व्यवसायिकाला जवळच्या रुग्णालयात दाखल झाल्या असून त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
गेले काही दिवसांपासून पुणे शहरांमधील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच दुसरी गोळीबाराची घटना घडल्याने पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या
रविवारी सायंकाळी पुण्यातील नाना पेठे येथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून त्याचबरोबर कोयत्याने वार करण्यात आला. जवळपास 12-13 जणांची वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केल्याचं सीसीटिव्हीच्या माध्यमातून समोर आलं आहे. सदर प्रकरणी पुणे पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर आंदोकर यांच्या बहीण, मेहुणा, भाचा यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमदर्शी ही हत्या कौटुंबिक वादातून केल्याचं समोर आलं मात्र, आता या घटनेबाबत अनेक नवनवीन खुलासे समोर येऊ लागले आहेत. या घटनेला एक महिनाही झाला नाही, तोपर्यंत उरूळी कांचन येथे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.(Pune Crime News)
हे ही वाचा :
एकाने पीडितेचे डोक्याचे केस पकडून खोलीत नेले; दुसऱ्याने चाकूचा धाक दाखवत अब्रू लुटली, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)