एक्स्प्लोर

धक्कादायक! बँकेचे हफ्ते न भरल्याने कर्जदारच्या मुलालाच उचलले, डांबून ठेवले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2025 रोज शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात एका तरुणाची अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास केला.

सोलापूर : एकीकडे बीडमध्ये खंडणीचा गुन्हा व अपहरण करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, या घटनेवरुन राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापुरात एका खासगी बँकेतील (Bank) वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला आणि कुठल्याही संस्थेळा काळिमा फासेल असं कृत्य केलंय. केवळ चारचाकी वाहनाचे हफ्त चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालही उचलून नेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील (Solapur) जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2025 रोज शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात एका तरुणाची अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास केला. त्यानुसार, येथील बँक कर्मचार्‍यांनी चक्क चार चाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे चक्क अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले होते, सोलापुरात या खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात आल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्यास एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते.  याप्रकरणी, वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या  शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या तिघांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील अधिक तपास सुरू आहे.

अपहरणानंतर कर्जदारास मागितली खंडणी

वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले. मात्र, त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याचंही पोलिसा तपासातून समोर आलं आहे. त्यामुळे, चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे. दरम्यान, बँक किंवा फायनान्स कंपनींचे एजंट सक्तीची किंवा गुंडगिरी पद्धतीने वसुली करत असतील तर कर्जदार किंवा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूरच्या नागरिकांना विजय कबाडे यांनी केलं आहे. 

हेही वाचा

शिवराज राक्षेने लाथ घालून चूक केली, अशा पंचांना गोळ्याच घातल्या पाहिजे : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Malad Railway station: धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Malad Railway station: धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
Mauni Roy: वृद्ध अंकलचे अश्लील चाळे, कमरेवर हात .. लाईव्ह कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
वृद्ध अंकलचे अश्लील चाळे, कमरेवर हात .. लाईव्ह कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Prithviraj Chavan : दावोस दौऱ्यावर टीका करणे अयोग्य, पण अदानी, लोढांसारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार हा एक क्रूर विनोद; पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
दावोस दौऱ्यावर टीका करणे अयोग्य, पण अदानी, लोढांसारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार हा एक क्रूर विनोद; पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
Sanjay Raut on Eknath Shinde Shivsena: पुढीस लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात नसेल, धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाईल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
पुढीस लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या हातात नसेल, धनुष्यबाण चिन्हं गोठवलं जाईल; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Embed widget