एक्स्प्लोर

पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार

वादग्रस्त पूजा खेडकरांच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सगळी माहिती दिली जाणे अपेक्षीत आहे.

पुणे :  डॉ. पुजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी आय ए एस होण्यासाठी मिळवलेल्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची (Non Creamy Layer Certificate) 
अहमदनगर जिल्हाधिकारी सखोल चौकशी करून केंद्र सरकारला त्याबाबतचा अहवाल सादर करणार आहेत. त्यासाठी आयकर विभागाकडून खेडकर कुटुंबियांच्या उत्पन्नाची माहिती आणि त्यांच्या आई - वडीलांनी भरलेल्या टॅक्सची माहिती मागविण्यात आलीय.  त्याचबरोबर स्वतः पुजा खेडकर यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची आणि त्यातून त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मागविण्यात आलीय. अहमदनगर चे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी ही माहिती जमा करायला सुरुवात केलीय.
 
वादग्रस्त पूजा खेडकरांच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सगळी माहिती दिली जाणे अपेक्षीत आहे. त्याच संदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी चौकशी करत आहेत. पूजा  खेडकरांचे आई वडील जरी एकमेकांपासून विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आले असले तरी दोघांचे उत्पन्न हे तपासले जात आहे. त्याचबरोबर  पूजा खेडकरांच्या नावावर देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. त्या मालमत्तेपासून त्यांना उत्पन्न देखील मिळते. हे सर्व तपशील पूजा खेडकरांनी आयकर विभागाकडे दाखल केलेल्या आयटीआरमधून समोर आले आहेत. ही सर्व माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकऱ्यांकडून गोळा केली जात आहे.

पूजा खेडकरांचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट खरे की खोटे?

जिल्हाधिकाऱ्यांकडून गोळा करण्यात आलेली माहिती केंद्र सरकारची जी चौकशी समिती आहे त्यांना सोपवण्यात येणार आहे. त्यातून पूजा खेडकर  यांनी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळवले ते खर होतं का? दुसरीकडे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवत आहेत तर आयटीआर भरताना दाखवलेल्या उत्पन्नांचे काय करायचे या सगळ्या प्रश्नांचा ऊहापोह या चौकशीतून होणार आहे. 

पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा झाली रात्री 11 ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.  सनदी सहायक जिल्हाधिकारी  पूजा खेडकर  या मुक्कामी असलेल्या  वाशिमच्या स्थानिक विश्रामगृहावर रात्री सव्वा दहा वाजता  पोलीसांचे पथक पोहचले होते. जवळ पास  पूजा खेडकर यांची बंद दाराआड तीन तास चौकशी  पोलिसांनी केली.मात्र हे पथक नेमकं वाशिम पुणे की अहमदनगरचे या वरुन कयास रंगू लागले आहेत.  मात्र,अस असलं तरी वाशिम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने खुद्द पूजा खेडकर यांनी पोलिसांना काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वरून वाशिमच्या स्थानिक पोलीसाच एक महिला उपविभागीय अधिकारी नीलिमा आरज यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वाशिमच्या  विश्रामगृह येथे माहिती घेतली.    पूजा खेडकर यांनी पोलिसांना काय माहिती दिली आणि ती कोणती गुप्त माहिती होती ते  वाशिम पोलिसांना माहिती असणार आहे .  

Video :पूजा खेडकरांच्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची छाननी

हे ही वाचा :

 IAS Pooja Khedkar : खोटे प्रमाणपत्र, मुलाखत, नियुक्ती अन् राजकीय हस्तक्षेप; पूजा खेडकर प्रकरणानंतर UPSCला 10 मोठे प्रश्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!
Marathi Serial Updates Sunil Barve : ''नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री
'नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री
मोठी बातमी : रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 'वर्षा'वर आंदोलनाआधीच उचललं
मोठी बातमी : रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 'वर्षा'वर आंदोलनाआधीच उचललं
Maharashtra Vidhan Sabha Election : आता भाजपच्या आमदारांवर टांगती तलवार! संघाची सुद्धा झाली एन्ट्री; कोणाकोणाला फटका बसणार?
आता भाजपच्या आमदारांवर टांगती तलवार! संघाची सुद्धा झाली एन्ट्री; कोणाकोणाला फटका बसणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MSRTC Scam : कंडक्टर्सकडून हेराफेरीची माझाला कबुली 'ज्येष्ठ' घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाशSanjay Raut Full PC : कायदा आहे तरी कुठे ? पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलंय - संजय राऊतRavikant Tupkar Arrested : शेतकऱ्याचा हिसका दाखवून देणार, ताब्यात घेताच तुपकरांची संतप्त प्रतिक्रीयाCM Eknath Shinde Nashik  :  नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम; व्यासपीठाच्या बाजूला साचलं पाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!
Marathi Serial Updates Sunil Barve : ''नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री
'नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री
मोठी बातमी : रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 'वर्षा'वर आंदोलनाआधीच उचललं
मोठी बातमी : रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, 'वर्षा'वर आंदोलनाआधीच उचललं
Maharashtra Vidhan Sabha Election : आता भाजपच्या आमदारांवर टांगती तलवार! संघाची सुद्धा झाली एन्ट्री; कोणाकोणाला फटका बसणार?
आता भाजपच्या आमदारांवर टांगती तलवार! संघाची सुद्धा झाली एन्ट्री; कोणाकोणाला फटका बसणार?
बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई संदर्भात दिल्या महत्वाच्या सूचना
बिहारच्या पाटण्यात कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारे उपविभागीय दंडाधिकारी मंगळवेढ्याचे; कारवाई न करण्याच्या दिल्या सूचना
Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं; संजय राऊतांनी ललकारलं
चंद्रशेखर बावनकुळे राजकारणातली वाया गेलेली केस, त्यांनी कानाचं ऑपरेशन करून घ्यावं; संजय राऊतांनी ललकारलं
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; काँग्रेसने तीन वाक्यात विषय संपवला, ठाकरेंना भूमिका मान्य होणार?
चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा 'तेच' कृत्य, परिसरात संतापाची लाट
चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा 'तेच' कृत्य, परिसरात संतापाची लाट
Embed widget