Pune Crime News: गळा दाबून घेतला जीव; नंतर धारदार शस्त्राने केलेले मृतदेहाचे तुकडे फेकले नदी पात्रात, शेवटी असं उकललं' त्या' घटनेचं गूढ
Pune Crime News: पुण्यात गेल्या काही दिवसांपुर्वी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाच आज अखेर उलगडा झाला आहे. 26 ऑगस्ट रोजी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाचा तपास पुणे पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे.
पुणे: पुण्यातील मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य अखेर पुणे पोलिसांनी शोधून काढलं आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकिना खान या महिलेची अतिशय निर्घृण हत्या (Pune Crime News) केली. विशेष म्हणजे यामागचा खरा सूत्रधार तिचा सख्खा भाऊ निघाला. सकिनाचा सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीनाचा गळा दाबून जीव घेतला आणि त्यानंतर पुरावे नष्ट होतील या उद्देशाने तिचे तुकडे केले आणि नदीत फेकून दिले. सकीना ज्या भागात राहत होती तिच्या शेजाऱ्यांना ती कुठे गायब झाली आहे याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
नेमकं काय घडलं?
पुण्यात गेल्या काही दिवसांपुर्वी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाच आज अखेर उलगडा झाला आहे. 26 ऑगस्ट रोजी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाचा तपास पुणे पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे. हा मृतदेह कोणाचा आहे, हत्या का केली, हत्या करणारे कोण होते, आणि इतर गोष्टींचा छडा आज पुणे पोलिसांनी लावली आहे. सकीना खान नावाच्या महिलाचा हा मृतदेह (Pune Crime News) होता, तिची अशी निर्घृण हत्या तिच्या सख्ख्या भावाने आणि वहिनीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हत्येमागचं कारण काय?
मृत सकीना खान पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीत राहत होत्या. ती खोली सकीना खानच्या नावावर होती. ती खोली त्यांनी सोडून जावी असं त्यांचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना वाटतं होतं, यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. या कारणामुळे दोघांनी मिळून सकीना खान यांची हत्या केली आणि घरातच धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे (Pune Crime News) केले. त्या तुकड्यांना भर पावसात मुठा नदीत फेकण्यात आलं. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली.
शेजाऱ्यांमुळे प्रकरण आले उघडकीस
हत्या केल्यानंतर भावाने आणि वहिनीने सकीना खान गावाला गेल्याची खोटी माहिती शेजार्यांना दिली होती. त्यावेळी शेजार्यांनी सकीना खानच्या गायब होण्याबद्दल संशय व्यक्त केला आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करून तपास सुरू केला.
पोलिसांनी तपास करून अशपाक खान आणि हमीदा यांना अटक केली आहे. त्यांनी हत्या केलेल्या खोलीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास केला आणि हे गूढ उकलले. या प्रकरणात पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी झाली असून, त्यांनी हत्येचं गुढं उकललं आहे.सकीना यांची धारदार शस्त्राने हत्या केली त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले, पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. यामुळे हत्या करून मृतदेह नदीत फेकले.