एक्स्प्लोर

Vijay Mane : मी मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो यात माझी चूक काय?; डुप्लिकेट एकनाथ शिंदे प्रकरणात पुणे पोलिस काय उत्तर देणार?

Pune News : मी मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो यात माझी चूक काय असं म्हणत विजय माने यांनी कोर्टात दाद मागितली आहे. हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. या संदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे.

Pune Vijay Mane News: राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांच्यासारखा हुबेहुब दिसणाऱ्या विजय माने यांनी हायकोर्टात  (Bombay High Court) धाव घेतली होती. पुण्यात त्याच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत विजय माने यांनी (Vijay Mane) मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मी मुख्यमंत्र्यांसारखा दिसतो यात माझी चूक काय? असं म्हणत त्यांनी कोर्टात दाद मागितली आहे. हे प्रकरण पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे. या संदर्भात पोलिसांना नोटीस जारी केली आहे.

या प्रकरणावर पुणे पोलिसांनी 18 ऑक्टोबरपर्यंत आपलं उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीवेळी कोर्टाने हे निर्देश दिले आहे. मात्र यावर आता पुणे पोलिस काय करणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

'मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत आहे'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा, दाढी आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणाऱ्या विजय माने यांचा फोटो सराईत गुन्हेगारासोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असता पोलिसांना एक फोटो मिळाला. त्या फोटोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचं दिसत होतं. यावरुन राजकीय वातावरण पेटलं होतं. विजय माने यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत आहे, असं शिंदे समर्थकांचं म्हणणं आहे.

याची गंभीर दखल घेत  मुख्यमंत्र्यांचं रूप घेऊन फसवल्याच्या आरोपात विजय नंदकुमार मानेविरोधात पुणे शहर गुन्हे शाखेनं कलम 419 (फसवणूक), कलम 469 (खोटी, बनावट कागदपत्रे तयार करणे किंवा बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करणे), कलम 500 (बदनामी, अब्रू नुकसानी) या कलमांतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका माने यांनी अॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत दाखल केली होती. 

पोलिसांनी विजय माने याच्याविरोधात केलेली कारवाई अत्यंत उत्साहाच्या भरात केलेली, चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा दावा या याचिकेतून करण्यात आला होता. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी पार पडली आणि यावर आता पुणे पोलिसांना कोर्टानं उत्तर मागितलं आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad: व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
व्हॉट्सॲपवर भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचे दोन नेते आपापसात भिडले, आधी धमकी अन् नंतर हल्ला... नेमकं काय घडलं?
Chhota Varkari : 'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
'छोटा वारकरी'ने मारली बाजी! महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक गौरव, वारीव्हर्स स्टुडिओजला Creative AI Luminary Award 2026 प्रदान
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र
मी सक्षम उमेदवार, विधानपरिषदेवर मला संधी मिळावी, रुपाली ठोंबरेंचं सुनेत्रा पवारांना पत्र

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget