Namdev Jadhav : नामदेव जाधव शाईफेक प्रकरण; पुण्यात 10 ते 15 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
नामदेव जाधव यांच्या तक्रारीवरुन पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शाईफेक केली होती.

Namdev Jadhav : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक केली होती. या प्रकरणी आता नामदेव जाधव आक्रमक झाले आहे. त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे. त्यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल संध्याकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी त्यांनी थेट नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक केली होती. त्यावरुन 10 ते 15 अज्ञातांविरोधात करण्यात आला पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद पवारांविरोधात टीका करणाऱ्या नामदेव जाधवांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक झाले होते. दरम्यान यावेळी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली होती. नामदेव जाधव यांच्याविरोधात खंडणी घेतल्याचा आरोप करण्यात आला असून, अशा व्यक्तीने शरद पवारांविरोधात टीका करणं चुकीचं असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे नामदेव जाधव करत असलेले आरोप हे पूर्णपणे चुकीचे असल्याचं देखील कार्यकर्त्यांनी म्हटलं होतं.
सगळ्यांवर गुन्हा दाखल करणार; जाधव
या सगळ्या प्रकरणानंतर नामदेव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असून यामध्ये पहिलं नावं हे शरद पवार आणि रोहित पवारांचं असेल. तसेच त्या दोघांची आमदारकी, खासदारकी रद्द करण्याची मागणी देखील करणार असल्याचं नामदेव जाधव यांनी यावेळी म्हटलं होतं.
माफी मागितली नाही म्हणून सांगून काळं फासलं; राष्ट्रवादी
नामदेव जाधवच्या हा हेतूत राज्यात ओबीसी विरूध्द मराठा असा असा संघर्ष उभा करत आहे. 1983 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण लागू झालं अशी बतावणी हे नामदेव जाधव करत आहे. वास्तविक पाहता 1983 साली पवार विरोधीपक्षनेते होते तर ओबीसी आरक्षण हे 1990 च्या दशकात देण्यात आले आहे. म्हणूनच नामदेव जाधव करत असलेले आरोप खरे असतील तर त्यांनी पुरावे उघड करावेत अन्यथा पवार जाहीर माफी मागावी असा ईशारा आम्ही नामदेव जाधवला दिला होता. अन्यथा त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी पूर्वसूचनाही दिली होती. असं असतानाही नामदेव जाधवने पुरावे सादर केले नाहीत, पवारांची माफीही मागितली नाही, असा आरोप त्यांनी केले होते.
इतर महत्वाची बातमी-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
