एक्स्प्लोर

पुण्यातल्या खेड तालुक्यात धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या

हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणीने आपले अश्लील फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचाच राग धरुन अजित कान्हूरकर या तरुणाने तक्रारदार तरुणीच्या भावाची हत्या केली.

पुणे : धावत्या बसमध्ये तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाच्या बहिणीने आपले अश्लील फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्याचाच राग धरुन अजित कान्हूरकर या तरुणाने तक्रारदार तरुणीच्या भावाची हत्या केली. पीडित तरुणाच्या बहिणीने 8 जूनला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती आणि त्यानंतर गुन्हा देखील झाला होता. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक केली नव्हती. बहिणीचे फोटो पोस्ट करणाऱ्या अजित कान्हूरकरनेच हत्या केल्याचं समोर आलं आहे. अजित कान्हूरकर आणि पीडित तरुण हे खेडच्या दावडी गावात राहणारे आहेत. अजितने पीडित तरुणाच्या बहिणीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही महिन्यांपासून अजित आणि पीडिताच्या बहिणीचे प्रेमसंबंधही होते. दोघेही पुण्यात इंजिनियरिंगचं स्वतंत्र महाविद्यालयात शिक्षण घेतात. विवाहाला घरच्यांचा विरोध असल्याने अजितने त्या मुलीचे अश्लील फोटो आणि खाजगी मेसेज फेसबुकवर पोस्ट केले. याप्रकरणी 8 जूनला मुलीने खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी या तक्रारीला गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोप आहे. तक्रार दाखल केल्यामुळे अजित संतापला. त्याने फेसबुकवर पुन्हा "माफ कर दो भाईलोग, बहुत तडफा हू. मेरी तरफ से भी सोच लो, उसको भी तडपणा चाहीये." असा मजकूर टाकला. त्यानंतर काही वेळाने त्याने बसकडे आगेकूच केली. सकाळी सव्वा सात वाजता आधी अजित बसला, नंतर खेडला महाविद्यालयात जाण्यासाठी मृतक चढला, मृतक गाडीत बसताच काही वेळात कोयत्याने त्याच्या डोकं, मान आणि डोळ्यावर हल्ला चढवला. अजितचं रौद्ररुप पाहून बसमधील एकाही प्रवाशाने मध्यस्थी केली नाही. त्यामुळे हत्या करून तो पसार होऊ शकला. त्यानंतर जमावाने बस थेट खेड पोलीस स्टेशनला आणली. वातावरण तणावाचं झालं होतं. पोलिसांनी 8 जूनच्या तक्रारीनंतर हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. पोलिसांनी अजितच्या शोधासाठी चार पथकं रवाना केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Rohit Pawar : रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
रोहित पवारांनी 'मफलर मॅन' म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोटो दाखवला, दादांचा घातपात करणाऱ्यांना वाचवल्याचा आरोप
Pune News: अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले
अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget