एक्स्प्लोर
ग्रामस्थांकडून फुरसुंगी कचरा डेपोची अंत्ययात्रा, तर मनसेचंही आंदोलन
पुणे : तब्बल 19 व्या दिवशीही पुण्यात कचराकोंडी कायम असल्याने यावर कधी तोडगा निघणार हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे रस्त्यावरही आता संताप व्यक्त होतोय. गावकऱ्यांकडून फुरसुंगीत आज कचरा डेपोची अंत्ययात्रा काढण्यात आली.
कचराडेपोचं निधन झालं असं म्हणत फुरसुंगी आणि उरळीमधील गावकऱ्यांनी ही अंत्ययात्रा काढली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
पुण्याच्या महापौरांच्या केसरी वाड्यातील घरासमोर कचरा टाकून मनसेने आंदोलन केलं. दरम्यान परदेश वारीवरुन परतलेल्या आयुक्त कुणालकुमार यांनी लवकरच कचराकोंडी फोडण्याचं आश्वासन दिलं आहे.
त्यामुळे आयुक्त नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. फुरसुंगीकरांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने पुणे शहरात कचऱ्याचे मोठमोठाले ढिग जमा झाले आहेत. यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?
पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.
इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.
त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 19 दिवस केल्यास, 22 हजार टनांपेक्षा जास्त कचरा पुणे शहरात पडून आहे.
संबंधित बातम्या :
19व्या दिवशीही पुण्यातील कचराकोंडी कायम, सर्वत्र घाणीचं साम्राज्य
आयुक्त कुणाल कुमार पुण्यात, फुरसुंगी कचरा डेपोला भेट
पुण्याचा 'कचरा', सांस्कृतिक राजधानीची 'कोंडी'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement