एक्स्प्लोर

पतीला लैंगिक समस्या, मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर जबरदस्ती, बारामतीत संतापजनक प्रकार

पतीला लैंगिक समस्या असल्याने त्याने स्वत:च्या पत्नीला स्वत:च्याच मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बारामती : एक अतिशय धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील एका गावातून समोर आली आहे. पतीला लैंगिक समस्या असल्याने त्याने स्वत:च्या पत्नीला स्वत:च्याच मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बारामती तालुक्यातील एका गावात ही विकृत घटना घडली असून पीडित महिलेने पतीसह त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बारामती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी पती आणि पीडितेचा विवाह 2016 मध्ये झाला होता. वर्ष भर सुखाचा संसार सुरू होता. पण कालांतराने 2017 मध्ये पतीला लैंगिक समस्या जाणवू लागल्या. त्यामुळे त्याने त्याच्या बायकोला आपल्याच मित्रांशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. मित्राशी शारीरिक संबंध ठेवताना बघून पतीच्या देखील लैगिंक भावना जागृत होतील आणि त्यानंतर तो बायकोशी शारीरिक संबंध ठेवू शकतो, या विचाराने त्याने असं करण्यास सांगितल्याचा धक्कादायक दावाही पत्नीने केला आहे. 

पती की हैवान?

तक्रार करण्य़ात आलेला इसम त्याच्या मित्रांना बायकोशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असून पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास विरोध केला तर तो तिचे हात पकडून तिच्यावर जबरदस्ती करत. तसंच संबधित प्रकाराबाबत बाहेर सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने पत्नीला दिली होती. पण या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने 'हे थांबवा नाहीतर, मी जीवाचे बरे वाईट काहीतरी करून घेईल' अशी धमकी दिली होती. त्यांनंतर काही काळ पतीने पत्नीवर जबरदस्ती करणे थांबवले होते. परंतु पुन्हा एकदा पतीने सर्व प्रकार सुरु केल्याने तिने माहेरी जाऊन सर्व प्रकार माहेरच्यांना सांगितला. ज्यानंतर बारामती शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला पतीसोबत त्याच्या 7 ते 8 मित्रांवर देखील 10 डिसेंबरला  जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित महिला ही 24 वर्षांची असून या प्रकरणी बारामती पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

हे ही वाचा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
Maharashtra Assembly Elections 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 20 October 2024: ABP MajhaChhagan Bhujbal : Sameer Bhujbal अपक्ष लढणार की मविआचा पर्याय निवडणार? भुजबळ काय म्हणाले?ABP Majha Headlines : 10 AM : 20 October 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सManoj Jarange : मनोज जरांगे - मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी यांच्यात तब्बल दोन तास चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
Maharashtra Assembly Elections 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
Weather Update : मुंबई, ठाणेसह कोकणाला 'यलो अलर्ट', वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता
आज पावसाचा 'यलो अलर्ट', मुंबई, ठाण्यात पावसाच्या सरी; अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा
Vasai Crime : पती आला तेव्हा तिच्यासोबत 'तो' होता, संतापलेल्या पतीनं पत्नीला ओढणीनं गळा आवळून संपवलं; त्यानंतर आजारपणानं मृत्यू झाल्याचा रचला बनाव
पती आला तेव्हा तिच्यासोबत 'तो' होता, संतापलेल्या पतीनं पत्नीला ओढणीनं गळा आवळून संपवलं; त्यानंतर...
Embed widget