एक्स्प्लोर
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Pune Helicopter Crash: सदर भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते.

Pune Helicopter Crash
1/7

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे आज सकाळी हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली.
2/7

एका टेकडीवर ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्ट आहे. येथील हेलिपॅडवरुन आज सकाळी या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते.
3/7

सदर भाग डोंगराळ असल्याने येथे धुके होते. त्यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
4/7

अपघात झाल्यानंतर हेलिकॉप्टरने लगेच पेट घेतला आणि त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
5/7

मुळशीचा हा सगळा परिसर डोंगराळ आहे. पुण्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी डोंगराळ भागात मोठ्याप्रमाणावर धुके आहे. याच धुक्यामुळे हेलिकॉप्टरच्या वैमानिकाचा अंदाज चुकला असावा आणि हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज वर्तवविला जात आहे.
6/7

दिल्लीच्या हेरिटेज कंपनीचे हेलिकॅाप्टर आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना घेऊन मुंबईतून उडणार होते, अशी माहिती समोर आली.
7/7

काही दिवसांपूर्वी मुळशी भागातही एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. मात्र, त्यावेळी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. आणि आज पुन्हा हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानं सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Published at : 02 Oct 2024 09:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
