एक्स्प्लोर

Weather Update : मुंबई, ठाणेसह कोकणाला 'यलो अलर्ट', वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता

Rain Update : मुंबई, ठाण्यासह राज्यात आज पावसाच्या सरी पाहायला मिळणार असून अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain News : ऑक्टोबरमध्ये पावसाची रिमझिम सुरुच आहे. आजही मुंबई, ठाणेसह राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. शनिवारी संध्याकाळपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे आजही अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, कोकण आणि गोव्याच्या किनारपट्टीवर ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता, त्यानुसार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.

आज पावसाचा 'यलो अलर्ट'

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर पावसाची हजेरी पाहायला मिळत आहेत, यामुळे उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणात आज 'यलो अलर्ट' असल्याने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्री वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. 

आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता

मुंबईसह कोकणात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुंबईसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी उशिरा मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होते. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच हा आठवडाभर पावसाचा अंदाज कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे आठवडाभरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मुंबई, ठाण्यात पावसाच्या सरी

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रात आतापर्यंत अपेक्षित सरासरीपेक्षा चार टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील काही भागात पावसाची सरासरी नोंद कमी असल तरी मुंबई शहरात यंदाच्या पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला, तर मुंबई उपनगरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला असून सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तसेच, पालघर जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tuljapur : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणात 40 जणांवर गुन्हा दाखलMVA Meeting Update : मविआत तणातणी? ठाकरेंनी बोलावली तातडीने बैठकABP Majha Headlines : 12 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 20 October 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
अमित शाहांकडून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन, थेट तारखा सांगून संजय राऊतांचा गंभीर आरोप!
K P Patil meet Sanjay Raut: के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
के.पी. पाटील संजय राऊतांच्या भेटीला, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा; म्हणाले, 'संघातून इच्छुक...'
Chhagan Bhujbal : समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात? छगन भुजबळ यांनी नेमकं सांगितलं; म्हणाले...
Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
Bopdev Ghat Incident: ‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
‘बोपदेव घाट’ प्रकरणातील पीडित तरुणीला पाच लाखांची नुकसान भरपाई, ‘मनोधैर्य योजने’अंतर्गत मिळणार मदत
Maharashtra Assembly Elections 2024 : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पराभवाचा बदला घेणार, काँग्रेस विरोधात रिपब्लिकन ऐक्य मैदानात, विदर्भात उमेदवार देणार
Nashik Vidhansabha: देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
देवळालीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीटासाठी भाऊगर्दी; योगेश घोलपांसह राजश्री अहिरराव मैदानात, सरोज अहिरेंविरोधात थोरले पवार कुणाला संधी देणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
फडणवीसांच्या भेटीनंतरही तोडगा निघाला नाही? आता वरिष्ठांकडून स्नेहलता कोल्हेंच्या मनधरणीचा प्रयत्न, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सुटणार?
Embed widget