Salman Khan: 60 बॉडीगार्ड, ओळखपत्र पडताळणी..सलमाननं बिग बॉसचा विकेंड का वार केला कडेकोट बंदोबस्तात शूट
अलिकडेच बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमक्यांनंतर त्याच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत असल्यानं सलमानची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Salman Khan: सध्या टीव्हीवर बिग बॉसच्या 18व्या सिझनची (Bigg Boss 18) जोरदार चर्चा आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सुरु झालेल्या बिगबॉसच्या स्पर्धकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय. पण सध्या बिगबॉसचा होस्ट सलमान खानकडे (Salman Khan) प्रेक्षकांसह माध्यमांचंही तेवढंच लक्ष आहे. बाबा सिद्दकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगच्या धमक्या त्यानंतर वाढलेली सलमानची सुरक्षा हा साऱ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलाय. दरम्यान या साऱ्या प्रकरणातही तो बिगबॉसच्या शुटसाठी जाणार का याचीच साऱ्यांना उत्सूकता होती. पण कडेकोट बंदोबस्तात सलमानने बिगबॉसचे शुट पूर्ण केले आहे.
बिग बॉसच्या घरात 'विकेंड का वार' म्हणजे आठवडाभरात घरात झालेल्या प्रकाराचा आढावा घेणारा एपिसोड. यात सलमान खान साऱ्यांच्याच वागण्याची हजेरी घेत असतो. अनेकांना समजावून कधी दरडावून निवाडा करताना दिसतो.
60 गार्डसच्या कडेकोट सुरक्षेत केलं शूट
सलमान खान बिगबॉसच्या यंदाच्या आठवड्यात शुटसाठी गेला तो ६० गार्डच्या कडक सुरक्षेतच. अलिकडेच बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमक्यांनंतर त्याच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत असल्यानं सलमानची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बाबा सिद्दकी यांच्या मृत्यूनंतर तो पहिल्यांदाच शोच्या शुटिंगसाठी आल्याचं दिसलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या सुरक्षेसाठी सेटवर ६० सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. जे शोमध्ये कोणतीही दूर्घटना होऊ नये याची काळजी घेत होते असे सांगण्यात आले आहे.
शोच्या सेटची पडताळणी, ओळख तपासणी
सलमानच्या सुरक्षेची बिगबॉसचे निर्मातेही पूर्ण काळजी घेत असून सेटची पूर्ण चाचपणी करून ओखपत्र पडताळणीही करण्यात आल्याचे समजते. शिवाय बिग बॉसच्या सेटवर ६० गार्डसचा कडक बंदोबस्तही करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.
बाबा सिद्दकींसोबत सलमानचे चांगले संबंध
बाबा सिद्दकी यांच्या इफ्तार पार्टीने मनोरंजनसृष्टीत चांगलेच प्रसिद्ध होते. सलमान आणि बाबा सिद्दकी यांची घरोब्याचे संबंध होते. त्यांच्या हत्येच्या बातमीनं सलमान आणि त्याचे संपूर्ण कुटुंब हादरलं असल्याचं अरबाज खाननंही भाईजान दु:खी असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, विकेंड का वारमध्येही मला इथे यायचं नव्हतं असं सांगितलं होतं.
सलमानने व्यक्त केल्या मनातल्या भावना
दरम्यान वीकेंड का वारमध्ये सलमान त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे. शिल्पाला तो म्हणतो की, शिल्पा जेव्हा तुझी मुलगी जेवणावर राग काढते तेव्हा तू तिला काय सांगते...त्यावर शिल्पा म्हणते की, सर जेवणावर राग नव्हता तो, त्याचा जो माज होता त्यावर तो राग होता.. तेव्हा सलमान तिला म्हणतो की,भावनांशी कोणतंही नातं या घरामध्ये ठवू नका.. जसं आज मला या सेटवर यायची अजिबात इच्छा नव्हती.. पण माणसाला काही गोष्टी या कराव्याच लागतात...