Pimpri-Chinchwad Plastic Issue: व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या नंतरच कारवाई करा- महेश लांडगे
Pimpri-Chinchwad Plastic Issue: प्लास्टिक बंदी किंवा त्यासंदर्भात कारवाई करताना व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या, असं आवाहन भाजप आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

Pimpri-Chinchwad Plastic Issue: प्लास्टिक कॅरीबॅग बंदीचा निर्णय व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन घ्यावा.मनमानी दंड आकारून व्यापारी-प्रशासन वादाची परिस्थिती निर्माण करू नका, असे आवाहन भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
पर्यावरणाचे रक्षण आणि स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासन निश्चितच चांगले काम करत आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्याबाबतीत प्रशासनाची भूमिका स्वागतार्ह आहे. दैनंदिन व्यापार आणि व्यापारात प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय जनहिताचा आहे. मात्र,यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यवाही करावी, असा सल्ला त्यांनी दिलाय.
शहरात गेल्या काही दिवसांपासून प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर मुसंडी मारली जात आहे. त्यामुळे व्यापारी आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. प्रशासन अन्याय करत असल्याचा संदेश जात आहे. पालिका प्रशासनाने प्लास्टिक विरोधी पथक तयार केले आहे. यासोबतच 10 ते 15 अधिकाऱ्यांनी अचानक त्याच दुकानावर छापा टाकून कॅरीबॅगची तपासणी केली,अशा तक्रारी समोर येत असल्याचेही आमदार म्हणाले.
प्लास्टिक कॅरीबॅग बनवणाऱ्यांवरच कारवाई करा
प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची भूमिका रास्त आणि नियमानुसार असली, तरी शहरातील व्यापारी आणि दुकानदारांना 2 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. कोविड काळात आणि लॉकडाऊनच्या काळात व्यापारी आणि लहान दुकानदारांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली होती.दोन वर्षांनंतर आता व्यवहार सुरळीत आहे.प्लास्टिक कॅरीबॅग बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, असंही ते म्हणले.
त्यासाठी शहरातील व्यापारी आणि संबंधित संघटनांचे पदाधिकारी यांच्यात विशेष बैठक बोलावून क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि विशेषत:अशा प्लास्टिकच्या कॅरीबॅग तयार केलेल्या ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर बंदी घालण्याबाबत जनजागृती करण्यात यावी.फक्त त्या उत्पादनावर बंदी घातली पाहिजे. कॅरीबॅगचे उत्पादन बंद झाले तर लोकांचा वापर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर कापडी पिशव्यांच्या वापराबाबत शहरात प्रबोधन केले पाहिजे. कापडी पिशव्यांची विक्री दुकानदार व व्यापाऱ्यांना बंधनकारक करावी,अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली.























