एक्स्प्लोर

Pune Corona Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; आज कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

Pune Corona Update : पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्यू संख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही

 पुणे : पुणेकरांसाठी सर्वात आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. तिसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच पुण्यात कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. पुणे शहर आणि ग्रामीण दोन्हीमध्ये आज, कोरोनामुळे एकाही मृताची नोंद नाही. दिवसभरात पुणे जिल्ह्यात 105 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 240 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधित रूग्णांची संख्या  14 लाख 50 हजार 903 इतकी झाली आहे. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या 2177 इतकी झाली आहे. पुण्यातील मृताची संख्या 19 हजार 674 इतकी झाली आहे. आतापर्यंत 14 लाख 29 हजार 059 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. तिसऱ्या लाटेनंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळाला आहे.

राज्यात नवे 407 कोरोनाबाधित

 राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये होणारी घट आजही कायम आहे. आज रुग्णसंख्या थेट 500 खाली पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी राज्यात 407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 407 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. दिवसभरात एक हजार 967 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  राज्यात आजपर्यंत एकूण 77, 11, 343 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04 % इतके झाले आहे. राज्यात सद्यस्थितीला 6, 663 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज झालेल्या चार कोरोनाबाधितांच्या मृत्यूमुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 % इतका झाला आहे. सध्या राज्यात 1,32,886 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 653 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक
Rana Suryavanshi : मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
मंत्र्यांना मिळते तशा VIP सुरक्षेची हौस भोवली, बारामतीतील उद्योजकाचा स्वतःवरच हल्ल्याचा बनाव; पोलिसांचा खळबळजनक खुलासा
Pune Crime News: मित्रावर वायसीएम रुग्णालयात; पाहायला आलेल्या तिघांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी हुज्जत, पोलिसांनी समज देताच गचांडी धरली अन्...
मित्रावर वायसीएम रुग्णालयात; पाहायला आलेल्या तिघांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांशी हुज्जत, पोलिसांनी समज देताच गचांडी धरली अन्...
Sushma Andhare : शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या
शिंदे-फडणवीस एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्मा रिर्टन्स! नेमकं कोण कोणाचा गेम करतंय? मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती सुषमा अंधारे थेट बोलल्या

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
राज ठाकरेंकडून ती डॉक्युमेंट्री डिलीट; म्हणाले, 'मुंबई पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखतोय, डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की..'
Bhaskar Jadhav: ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंवर ऐकेरी भाषेत टीका; भास्कर जाधव म्हणाले, 'पाटलांचं काम आणि टीका करणारे यांची कुवत किती आहे, हे..'
ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगेंवर ऐकेरी भाषेत टीका; भास्कर जाधव म्हणाले, 'पाटलांचं काम आणि टीका करणारे यांची कुवत किती आहे, हे..'
SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही! RTI ला दिलेल्या उत्तरात आयोग म्हणतो, हे एक व्यापारी गुपित; AI वापराबाबतही मौन
SIR मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअरची निवडणूक आयोग माहिती देणार नाही! RTI ला दिलेल्या उत्तरात आयोग म्हणतो, हे एक व्यापारी गुपित; AI वापराबाबतही मौन
Vasai News: दहावीचा प्रिलिम पेपर दिला; शाळेतून थेट पोहण्यासाठी विहीरीवर गेला, कपडे, चपला, बॅग कडेला ठेवली अन्..., 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
दहावीचा प्रिलिम पेपर दिला; शाळेतून थेट पोहण्यासाठी विहीरीवर गेला, कपडे, चपला, बॅग कडेला ठेवली अन्..., 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
Gadchiroli News : हृदयद्रावक! रस्त्याअभावी आधी नवजात बाळाचा दुर्दैवी अंत, नंतर उपचारांअभावी आईचीही प्राणज्योत मालवली; गडचिरोलीच्या रेखनार गावातील दुर्दैवी घटना
हृदयद्रावक! रस्त्याअभावी आधी नवजात बाळाचा दुर्दैवी अंत, नंतर उपचारांअभावी आईचीही प्राणज्योत मालवली; गडचिरोलीच्या रेखनार गावातील दुर्दैवी घटना
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
कर्जत भीमाशंकरच्या जंगलात बेलगाम झाडांच्या कत्तली, अडीच लाखांवर झाडं धोक्यात; पर्यावरणाची राख करून प्रकल्पाचा घाट? स्थानिक नागरिक आज राज ठाकरेंची भेट घेणार
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
Flights to Saudi Arabia cancelled: सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
सौदी अरेबियाची उड्डाणे 7 नोव्हेंबरपर्यंत रद्द, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने उड्डाणे रद्द केली
Embed widget