Monsoon Update : पुण्यासह राज्यात पुढील 24 तास येलो अलर्ट जारी; शेतकऱ्यांची चिंता मिटेल?
पुणे शहरात पुढील 24 तास येलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
पुणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) (maharashtra weather update) पुणे शहरात पुढील 24 तास येलो अलर्ट जारी केला आहे. पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये 30 ऑगस्ट रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
राज्यात अनुकूल स्थिती नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप होती. पुढील आठवड्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.
येत्या पाच दिवसांत राज्यात हलका पाऊस
पुणे आणि महाराष्ट्रातील इतर अनेक जिल्ह्यांमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे आणि येत्या काही दिवसांत राज्यात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यात पुढील 24 तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD पुण्याचं हवामान आणि अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, येत्या पाच दिवसांत राज्यात हलका पाऊस पडू शकतो. या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे. सरासरीपेक्षा कमी यंदा पाऊस पडला आहे. मात्र येत्या काही दिवसात पावसाची शक्यता आहे.
8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो.
मान्सून परतीच्या वाटेवर?
मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. सध्याची परिस्थिती बघता परतीच्या पावसाबद्दल आम्ही कुठलाही अंदाज बांधलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Partial revival of Monsoon likely from 3rd/4th Sept onward: Slowly some R/F activity will increase over State for 3-4 days,especially over Vidarbha,Konkan& SE-Marathwada.Yellow alert for thunder/lightning,isolated heavy rain likely from 2nd/3rd onward .Farmers & all users b ready pic.twitter.com/QRBzwvi5zh
— Anupam Kashyapi Never B Upset (@anupamkashyapi) August 30, 2023
इतर महत्वाच्या बातम्या :
Pune Chandani Chowk : चांदणी चौकात भुलभुलैया? पुणेकर नाराज, महापालिका काढणार तोडगा