एक्स्प्लोर
चांदणी चौकात राडा, आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीमार
चांदणी चौकात जमाव हिंसक झाला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरु केला.

पुणे: मराठा आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या तोडफोडीनंतर, तिकडे चांदणी चौकातही मोठा राडा झाला. चांदणी चौकात जमाव हिंसक झाला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार सुरु केला. त्यानंतर जमावाने आणखी आक्रमक पवित्रा घेत, थेट पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही पोलिस जखमी झाले. या प्रकाराने चांदणी चौकात परिस्थिती चांगलीच चिघळली. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. तसंच लाठीमारही केला. मात्र जमावाच्या दगडफेकी अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे आंदोलकांनी पुणे -बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, चांदणी चौकातील सर्व रस्ते आणि पुणे - मुंबई एक्सप्रेस वे रोखून धरला. सकाळी साडेदहापासून एक्स्प्रेस वे वरील वाहतूक उर्से टोलनाक्यावर रोखण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलकांनी पुण्यातील हयात हॉटेलमध्येही चाल करुन तोडफोड केली. तसंच हयात हॉटेलमधील कार्यक्रमही बंद पाडला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागलं. आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. तसंच आंदोलकांनी भिंतीवर चढून घोषणाबाजी केल्या. भिंतीवरील दिवेही फोडले. एवढंच नाही तर या संपूर्ण घटनेचं वृत्तांकन करणाऱ्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही धक्काबुक्की केली. तसंच आंदोलकांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यावर हात ठेवून वृत्तांकन रोखण्याचा प्रयत्न केला. संबंधित बातम्या महाराष्ट्र बंद LIVE : चांदणी चौकात दगडफेक, पोलिसांकडून अश्रूधुराचा वापर 18-20 वयाच्या मुलांनी तोडफोड केली: पुणे जिल्हाधिकारी महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न! महाराष्ट्र बंद: विधानभवनाच्या गेटवर आमदार आबिटकरांचा ठिय्या महाराष्ट्र बंद : आचारसंहितेचं उल्लंघन, पेटवा-पेटवी कोण करतंय? महाराष्ट्र बंद : शरद पवारांच्या बारामतीमधील घराबाहेर ठिय्या
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























