एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम, सुट्ट्यांहून परतणाऱ्या वाहनांमुळे कोंडी
मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
![मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम, सुट्ट्यांहून परतणाऱ्या वाहनांमुळे कोंडी Heavy Traffic At Mumbai Pune Express Way मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे जाम, सुट्ट्यांहून परतणाऱ्या वाहनांमुळे कोंडी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/22224814/traffic.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांहून परतणाऱ्या वाहनांमुळे सायंकाळी सहा वाजल्यापासूनच या मार्गावर वाहतूक संथ गतीने आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांहून परतणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल नाक्यांवर सध्या जास्त गर्दी पाहायला मिळत आहे. घाटामधील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. मात्र टोल नाक्यांवर जास्त वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे तुम्हीही पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असाल तर वाहतूक कोंडीची स्थिती पाहूनच प्रवासाला लागा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)