(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gmail Account : 1 डिसेंबरपासून डिलीट होतील 'हे' gmail अकाऊंट्स,आजच तुमचा Gmail Data सेव्ह करा!
गुगल 1 डिसेंबर 2023 पासून Gmail अकाऊंट बंद करणार आहे. गुगलने 1 डिसेंबर 2023 पासून इनएक्टिव अकाऊंच पॉलिसी लागू करण्याची घोषणा केली आहे.
Gmail Account : गुगल 1 डिसेंबर 2023 पासून Gmail अकाऊंट (Gmail Account ) बंद करणार आहे. गुगलने 1 डिसेंबर 2023 पासून इनएक्टिव अकाऊंट पॉलिसी लागू करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही Gmail युजर्स असाल आणि गेल्या 2 वर्षांपासून जीमेल अकाऊंट वापरत नसाल तर सर्व जीमेल अकाऊंट्स बंद करण्यात येणार आहे. तसेच जीमेल, फोटो आणि ड्राइव्हची कागदपत्रे बराच काळ वापरली गेली नसतील तर तो डेटादेखील डिलीट होणार आहे. त्यामुळे जर तुमचं एखादं जुनं अकाऊंट असेल जे तुम्ही आता वापरत नाही. तर त्या अकाऊंटमधील सर्व डेटा आजच सेव्ह करुन घ्या.
कोणती Gmail अकाऊंट बंद होणार?
जर तुम्ही बराच काळ गुगल अकाऊंटमध्ये लॉग इन केले नसेल तर तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. जर तुम्ही सतत जीमेल वापरत असाल तर तुम्ही जीमेलचे अॅक्टिव्ह युजर्स आहात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अशा व्यक्तीचे जीमेल अकाऊंट डिलीट केले जाणार नाही आहे.
विशेष म्हणजे गुगलच्या नव्या पॉलिसीमध्ये शाळा किंवा बिझनेस वर्ल्डच्या गुगल आणि जीमेल अकाऊंटचा समावेश नाही. गुगलच्या मालकीच्या जीमेल, ड्राइव्ह, डॉक्स, मीट, कॅलेंडर आणि फोटोज सारख्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीतून यूट्यूब आणि ब्लॉगरला वगळण्यात आल्याचे गुगलने म्हटले आहे.
तर डेटा डिलीट होऊ शकतो..
जर तुम्ही बराच काळ जीमेल अकाऊंट वापरले नसेल तर तुमचा डेटा डिलीट होऊ शकतो. जर तुम्हाला तुमचे जीमेल अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करून तुमचा डेटा डिलीट करायचा नसेल तर तुम्ही 1 डिसेंबरपूर्वी जीमेल डेटा सेव्ह करावा. नाहीतर तुमचा सगळा डेटा डिलीट होऊ शकतो.
अकाऊंट आणि डेटा डिलीट करायचा नसेल तर काय कराल?
-तुमचं अकाऊंट डिलीट व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करा.
-पासवर्ड विसरला असाल तर तो रीसेट करा.
- याशिवाय सिक्युरिटी चेक करा आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वगैरे चालू करा.
-गुगलच्या या निर्णयाचा परिणाम फक्त वैयक्तिक गुगल अकाऊंट्सवर होणार आहे.
- शाळा, संस्था आणि बिझनेस अकाऊंट्सवर नाही.
-अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी गुगल अशा युजर्सना अनेक नोटिफिकेशन पाठवून रिकव्हरीची मागणी करत आहे.
-त्यासोबतच अनेक वर्षांपासून वापरात नसलेले एक्स (ट्विटर) अकाऊंट डिलीट करून आर्काइव्हमध्ये टाकले जाईल.
इतर महत्वाची बातमी-