Google Pay Extra Charge : Google Pay वर आता मोबाईल रिचार्जसाठी मोजावे लागणार एक्स्ट्रा फी, जाणून घ्या तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार?
भारतातील गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे मोबाइल रिचार्जसाठीही वेगळे शुल्क आकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Google Pay Extra Charge : भारतातील गुगल पे (Google Pay) युजर्ससाठी एक वाईट बातमी आहे. गुगल पे (Google Pay) मोबाइल रिचार्जसाठीही (Mobile Recharge) वेगळे शुल्क आकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक युजर्सने दावा केला आहे की, गुगल पेने कन्वीनियंस फीसच्या नावाखाली पैसे घेण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत गुगल पेने मोबाइल रिचार्ज करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नव्हते, परंतु आता तुम्हाला ते भरावे लागणार आहे.
गुगलने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी अनेक सोशल मीडिया युजर्सनी याचा दावा केला आहे. फोनपे आणि पेटीएम आधीच मोबाइल रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. जेव्हा बाकी कंपन्यांनी रिचार्जसाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली तेव्हा गुगलने म्हटलं होतं की, आपल्या गुगल पेवरील मोबाइल रिचार्ज नेहमीच फ्री असेल. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र आता शुक्ल आकारलं जात आहे.
किती पैसे द्यावे लागतील?
एका रिपोर्टनुसार, 749 रुपयांच्या रिचार्जवर 3 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. म्हणजेच जर तुम्ही 749 रुपयांचे रिचार्ज केला तर तुम्हाला एकूण 752 रुपये मोजावे लागतील. मात्र, हे शुल्क सर्व युजर्सकडून आकारले जात नाही. गुगल पेतर्फे टप्प्याटप्प्याने कन्वीनियंस फी लागू करण्यात येत आहे. अशा तऱ्हेने लवकरच सर्व गुगल पे युजर्ससाठी कन्वीनियंस फीस लागू होऊ शकते, असं बोललं जात आहे. याअंतर्गत 0 ते 100 रुपयांच्या रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तर 101 ते 200 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये सुविधा शुल्क आकारले जात आहे. याशिवाय 201 ते 300 रुपयांच्या रिचार्जवर 2 रुपये आकारले जातील. तर 301 किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर 3 रुपये आकारले जात आहेत.
कोणाला पैसे द्यावे लागणार नाही!
रिपोर्टनुसार, गुगल मोबाइल रिचार्जवर सुविधा शुल्क आकारत आहे, तर इतर व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अशा परिस्थितीत वीज बिलासह इतर रिचार्ज पूर्णपणे मोफत आहेत. गुगल पेच्या आधी पेटीएमने प्रथमच सुविधा शुल्क आकारले होते. मात्र, गुगल पेने सुविधा शुल्क लागू करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. वीज बिल भरताना काळजी घ्या अतिरिक्त शुल्क आकारत असेल तर कस्टमर केअरला माहिती द्या.
इतर महत्वाची बातमी-