‘यावर्षीच्या फीमध्ये 50 टक्के सवलत द्या’, लाॅच्या विद्यार्थ्यांची मागणी
कॉलेजने फक्त ट्यूशन फी घ्यावी आणि बाकीची फी माफ करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
पुण्यातील प्रतिष्ठित आयएलएस लॉ कालेजचा विद्यार्थी प्रणव आफळे याने सांगतिलं की, “मी एलएलबीच्या फर्स्ट इयरमध्ये असताना सेकंड सेमिस्टर सुरु होताच लॉकडाऊन सुरु झालं. माझं सरकारी अनुदान असलेले कॉलेज आहे. त्यामुळे मला ट्यूशन फी शून्य आहे. पण आमची फी 40 हजार आहे. कॉलेजच्या ज्या फॅसिलिटी मी वापरल्याच नाहीत त्यांची फी मी का भरावी? पण आम्ही फर्स्ट इयरची पुर्ण फी भरली होती. म्हणून आता सेकंड सेमिस्टरच्या फीमध्ये सवलत द्यावी अशी आमची मागणी आहे.”
शिवजी मराठा लॉ काॉलेजचा विद्यार्थी अमित कोदरे याने सांगितलं की, “सेकंड सेमिस्टरमध्ये आमचं कॉलेज हे फक्त 10 दिवस झालं. ज्या फॅसिलीटी आम्ही वापरल्या नाहीत त्यांची फी कशी भरणार? आम्हाला रिफंड मिळणार नाही. म्हणून आम्ही यावर्षी सवलत मागतोय.”
यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेजची विद्यार्थिनी रुतुजा गुलंदीकर हिने सांगितलं की, “आम्ही विद्यापिठाच्या कुलगुरुंना पत्र लिहून सवलत देण्याबाबत मागणी केली. पण आम्हाला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुर्ण फी माफ करा असं आमचं म्हणणं नाहीये. सेकंड सेमिस्टर पासून आम्ही घरीच आहोत. त्यामुळे यावर्षी सवलत द्यावी अशी आमची मागणी आहे.”
खाजगी शाळांकडे पालकही हीच मागणी करत आहेत. शाळांनी फक्त ट्यूशन फी घ्यावी अशी मागणी पालकही करत आहेत. पण यासंदर्भात अजून कोणताही तोडगा निघालेला नाही.
संबंधित बातम्या :