![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Serum Institute Fire :पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग
देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे.
![Serum Institute Fire :पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग Fire breaks out at Serum Institute India in Pune Serum Institute Fire :पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/21150805/pune-serum-institute.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
ज इमारतीत 4 जण अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. आगीचा कोणताही परिणाम कोव्हीशील्ड वॅक्सीन प्रोडक्शनवर होणार नाही, अशी माहिती सीरम इन्स्टीट्यूटने दिली. कोविशिल्ड' लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. कारण आग ही BCG लस बनवण्याच्या इमारतीला लागली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत तरी कुठल्याही जिवीतहानीबद्दलची माहिती नाही. मी तातडीने घटनास्थळी रवाना होत आहे, अशी माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)