Kiran Gosavi : वादग्रस्त पंच किरण गोसावीविरोधात पुण्यात आणखी गुन्हा दाखल
Kiran Gosavi : किरण गोसावीच्या चौकशीतून काय-काय गौप्यस्फोट होतात, यावर आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
FIR lodged Against Kiran Gosavi : मुंबई ड्रग्ज केस प्रकरणातील वादग्रस्त पंच किरण गोसावी याच्याविरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात गोसावीवर भारतीय दंड संहितानुसार कलम 420, 465, 468 यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तीन जणांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याचं पुणे पोलिसांनी माहिती दिली. सध्या फसवणूक प्रकरणी किरण गोसावी पोलिस कोठडीत आहे. पाच नोव्हेंबरपर्यंत किरण गोसावी याची पोलिस कोठडी आहे. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला फसवणूक प्रकरणात पुण्यातील एका लॉजमध्ये पहाटे 3.30 वाजता ताब्यात घेतलं होतं.
किरण गोसावी विरोधात 2018 मधे पुण्यात गुन्ह्याची नोंद आहे. त्याच्याविरोधात एप्रिल 2019 मधे चार्जशीट पाठवण्यात आली. किरण गोसिवीची सेक्रेटरी शेरबानो कुरेशी हिच्या अकांउटमधे चिन्मय देशमुखने तीन लाख रुपये पाठवले होते. मात्र, शेरबानो कुरेशीचे हे अकांउट किरण गोसावी बनावट कागदपत्रांच्या आधारे वापरत होता. पैसै परत मागितल्यावर त्याने चिन्मय देशमुखला धमकी दिली आणि शिवीगाळ केली. किरण गोसावी विरुद्ध ठाणे, कळवा, अंधेरी, पालघर अशा अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. किरण गोसावीने अनेक तरुणांना फसवले आहे. यामधे अनेकांची मोठी फसवणूक झाल्याचं समजतेय. किरण गोसावीच्या चौकशीतून काय-काय गौप्यस्फोट होतात, यावर आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.
प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांत आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. प्रभाकर साईलनं किरण गोसावीवर आर्यन खानला सोडवण्यासाठी शाहरुखच्या सेक्रेटरीमार्फत 25 कोटी रुपयांच्या तोडपाणीची मागणी केल्याचा आरोप केला होता. हा आरोप किरण गोसावीने खोडून काढत प्रभाकर साईलवर आरोप केला होता. पुणे पोलिसांनी अटक करण्यापूर्वी व्हिडिओतून किरण गोसावीने प्रभाकर साईल आणि त्याचा भावावर 255 कोटींचा आरोप केला होता. किरण गोसावीच्या आरोपाला प्रभाकर साईलचा भाऊ संतोष साईल यांनी प्रत्त्युतर दिलं आहे. मी किरण गोसावी यांना ओळखत नाही, पैशासाठी ते सुरक्षारक्षक म्हणून काम करतात आणि त्यांची पत्नी एका दवाखान्यात मेड क्लिनिकमध्ये काम करते. आता त्या 25 कोटींच्या गैरव्यवहाराशी त्याचा काहीही संबंध नाही, 4 महिनेपूर्वी तेव्हाच प्रभाकर घरातून निघून गेला, तेव्हापासून प्रभाकर साईलचा त्याचा भाऊ संतोष साईल याच्याशी कोणताही संपर्क नव्हता, याच संतोष साईलने सांगितले की, सुमारे ३ वर्षे प्रभाकर साईल आणि संतोष साईल एकाच कुटुंबात एकत्र राहत होते मात्र बॉडी गार्डची नोकरी मिळाल्यानंतर ते निघून गेले.तेव्हापासून दोन्ही भाऊ मध्ये संपर्क झाला नाही, संतोष साईलची आई आजारी आहे, पण त्यानंतरही प्रभाकर साईलने घरच्यांशी कोणताही संपर्क ठेवला नाही.संतोष कुटुंबाची काळजी घेतो, त्यामुळे तो किरण गोसावीला आयुष्यात कधीच ओळखत नाही. गोसावी यांनी त्यांच्यावर केलेले आरोप हे निराधार आहेत. संतोष साईल सांगतो की, तो त्याच्या दोन मुलांसह आई आणि पत्नीसोबत राहतो आणि १२ तास सुरक्षा रक्षक म्हणून काम करून घरी परतल्यावर तो कुटुंबासोबत राहतो. ड्रग्ज प्रकरणात त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही, त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करून किरण गोसावी यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली.