एक्स्प्लोर
पुण्यातील ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात
पुण्याच्या शनिवार वाड्यात आज होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे.
पुणे : पुण्याच्या शनिवार वाड्यात आज होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे.
भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर रोजी) पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेला सर्वोच्च न्यायालयालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, अॅड. प्रकाश आंबेडकर, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी, रोहित वेमूलाची आई राधिका वेमुला, उमर खालिद, उल्का महाजन, सोनी सोरी, अब्दुल हमिद अजहरी आदी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला ‘समस्त हिंदू आघाडी’चे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा कार्यक्रम झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, हा कार्यक्रम होऊ नये याबाबत त्यांनी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन दिले आहे.
तर दुसरीकडे महापौर मुक्ता टिळक यांनी परिषदेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महापालिकेने परवानगी दिल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र यामध्ये काही राजकीय वक्तव्ये झाल्यास, नियमाप्रमाणे परवानगी देणे शक्य नाही. त्यामुळे हा कार्यक्रम नियमांननुसार नसल्यास यांची परवानगी नाकारण्याचा सूचना प्रशासनला दिल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, हिंदू आघाडीच्या आधी पेशव्यांच्या वंशजांनी देखील हा कार्यक्रम शनिवारवाड्यावर घेण्यास विरोध केला आहे. तर एल्गार परिषदेच्या आयोजकांनी हा कार्यक्रम ठरल्यानुसार होईलच असे म्हटले आहे. राजकीय दबावाला बळी पडून पोलीस व प्रशासनाने आम्हाला दिलेली परवानगी रद्द केली, तर आम्ही शनिवारवाड्याबाहेर रस्त्यावर एल्गार परिषद भरवू असे म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement