एक्स्प्लोर
महाराष्ट्र सरकार कर्मदरिद्री, धनराज पिल्लेची टीका
पुणे: भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार धनराज पिल्लेला आज क्रीडामहर्षी हरीभाऊ साने पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पिल्लेने महाराष्ट्र सरकार कर्मदरिद्री असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रानी उपेक्षा केल्याने, आपण नरेंद्र मोदींनी गुजरातच्या वडोदरा येथे सुरु केलेल्या अकादमीमध्ये दोन वर्षांपासून नवीन हॉकीपटू घडवत असल्याचं सांगितलं.
धनराजनं महाराष्ट्राच्या जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली, पण त्याचवेळी राज्य शासनाकडून झालेल्या उपेक्षेवरही टिप्पणी केली. नव्या पिढीचे हॉकीपटू घडवण्यासाठी धनराजला अॅकॅडमी उभारायची होती. पण महाराष्ट्राऐवजी त्याला गुजरातच्या वडोदराची निवड करावी लागली, याबाबत खंत व्यक्त केली.
धनराजची जडणघडण पुण्यातच झाली होती. पुणेकरांनी आणि महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही, असं धनराजनं म्हटलंय. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या मदतीची आठवणही धनराजनं कायम ठेवली आहे.
पुण्यातील सन्मान सोहळ्यादरम्यान धनराजला त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आलं. तेव्हा धनराजनं हॉकी हेच आपलं पहिलं प्रेम असल्याचं म्हटलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement