एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र
जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत फुटल्यानं पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे.
पुणे: पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं. बघे बघेपर्यंत घर भरलं, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं..!
या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभऱ पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.
दरम्यान, डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की, त्या पाण्यात उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो. जनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे. पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली?
दरम्यान कॅनॉलची भिंत कशाने तुटली याबाबतच्या कारणांचा आता शोध सुरु आहे. कॅनॉलपासून केबल टाकण्याचं काम सुरु होतं. त्या कामामुळे कॅनॉलच्या भिंतीला धोका होता. तसं पत्र महापालिकेला दिलं होतं, असं आता सांगण्यात येत आहे.
घराच्या भिंती कोसळल्या
पाण्याचं प्रेशर इतकं होतं की घराच्या भिंतीही कोसळल्या आहेत. अनेकांचं कौटुंबीक साहित्य उद्ध्वस्त झालं आहे. अचानक पाणी आल्याने नेमकं काय होतंय हे कळलं नाही. पाण्याची प्रवाह इतका वेगवान होता की बघे बघेपर्यंत घरं पाण्याने भरली.
मुठा कालवा
मुठा कालवा हा मुठा नदीवर आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीतून या कालव्याद्वारे पाणी सोडलं जातं. या कालव्याद्वारे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातपाणी पुरवठा केला जातो. ग्रामीण भागात पिण्यासाठी आणि शेतीसाठी या कालव्याचं पाणी वापरलं जातं.
पुण्यात कालव्याची भिंत फुटली, रस्त्यावर महापुराचं चित्र pic.twitter.com/6DfqHZX263
— ABP माझा (@abpmajhatv) September 27, 2018
संबंधित बातम्या बघे बघेपर्यंत घर भरलं, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं नेलं..! पुण्यातील मुठा कालव्याची भिंत नेमकी कशामुळे कोसळली? पुण्यात कालव्याची भिंत कोसळली, रस्त्यावर महापुराचं चित्र VIDEO: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर PHOTO: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूरPHOTO: कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हात पुण्यात पूर https://t.co/lw61i6kJyX pic.twitter.com/VnP3KOuPao
— ABP माझा (@abpmajhatv) September 27, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
क्रीडा
Advertisement