एक्स्प्लोर
महापौर निवडणुकीतील भाजपच्या विजयाचा पिंपरीत 'चिखल'
अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या सहाय्याने भंडाऱ्याचा थर हटवला. मात्र तत्पूर्वी नागरिकांना करावी लागलेली कसरत सीसीटीव्हीत कैद झाली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसवर मात केलेल्या भाजपने जल्लोषात मात्र माती केली. पोत्याने उधळलेल्या भंडाऱ्याचा पावसाने चिखल झाला. यात आठ ते दहा वाहने घसरली, तर पायी चालणाऱ्यांचा तोलही गेला, यामध्ये एका दिव्यांगाचाही समावेश होता.
शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करण्याची वेळ आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या सहाय्याने भंडाऱ्याचा थर हटवला. मात्र तत्पूर्वी नागरिकांना करावी लागलेली कसरत सीसीटीव्हीत कैद झाली.
महात्मा फुलेंच्या वेशात आलेले राहुल जाधव महापौर आणि सचिन चिंचवडे उपमहापौर झाल्याची घोषणा होताच, पालिका आवारात भंडारा उधळून एकच जल्लोष करण्यात आला. एक दोन नव्हे, तर तब्बल 50 ते 60 पोती आणली होती. जेसीबी, चार चाकी वाहनांवर उभं राहून शेकडो कार्यकर्त्यांनी हा उन्माद घातला.
उपमहापौरांच्या तुलनेत महापौर राहुल जाधव यांचे कार्यकर्ते कैक पटीने होते. तीन तासानंतर मिरवणुका पालिकेबाहेर गेल्या, तेव्हा पालिका परिसरात आणि परिसरातील वाहनांवर भंडाऱ्याचा थर जमा झाला होता. तितक्यात पावसाची हजेरी लागली आणि या भंडाऱ्याचा चिखल झाला.
दुचाकी, चारचाकी असो, की पायी चालणारे नागरिक सर्वांना कसरत करावी लागली. यात आठ ते दहा वाहने घसरली. एका दिव्यांगासह अनेक पायी चालणाऱ्यांचा तोलही गेला. अग्निशमन दलाने दोन तासांच्या मेहनीतीनंतर हा थर हटवला.
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचा पहिलाच दिवस असा त्रास देणारा ठरल्याने पालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभर स्वच्छ भारत अभियान राबवलं असताना अशा पद्धतीने हरताळ फासले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement