एक्स्प्लोर
बालेवाडीत मजुरांच्या मृत्यूप्रकरणी बिल्डरांचा अटकपूर्व जामीन अर्ज
पुणे : पुण्याच्या बालेवाडी भागात काम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून शुक्रवारी झालेल्या अपघातात नऊ बिहारी मजुरांचा मृत्यू झाला. मात्र अद्यापही पुणे पोलिसांना आरोपी बिल्डरांपर्यंत पोहचता आलेलं नाही. अटक केलेल्या चौघांना 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 9 जणांचा मृत्यू
शुक्रवारी झालेल्या या अपघातानंतर शनिवारी पुण्यातल्या चतुःश्रुंगी पोलिसांनी दोन प्रोजेक्ट इनचार्ज आणि दोन आर्किटेक्ट्सना अटक केली. पण बिल्डर फरार असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे.पुण्यातील स्लॅब दुर्घटनेप्रकरणी चार जण अटकेत
प्राईड पर्पल ग्रुपच्या अरविंद जैन आणि श्रवण अगरवाल या दोन बिल्डरपर्यंत पोहचायला पोलिस सक्षम नाहीत का असाच प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे. बिल्डर अरविंद जैन, बिल्डर श्रवण अग्रवाल, शामकांत शेंडे आणि कैलाश वाणी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement