एक्स्प्लोर
पुण्यात ऑटिझमशी झगडणाऱ्या मुलांकडून गणेशोत्सवाचं साहित्य तयार
पुण्याच्या प्रसन्न ऑटिजम सेंटर इथली ऑटिस्टिक मुलं गणेशोत्सवाच्या तयारी लागली आहेत. प्रसन्न ऑटिझम सेंटरमधली ही मुलं गेल्या काही महिन्यांपासूनच असा बटवा बनवत आहेत.
पुणे : ऑटिझम म्हणजे स्वमग्नता या मानसिक अवस्थेशी झगडणारी अनेक मुलं आहेत. पुण्याच्या प्रसन्न ऑटिजम सेंटर इथली ऑटिस्टिक मुलं गणेशोत्सवाच्या तयारी लागली आहेत.
गणेशोत्सवात अनेक पूजेच्या वस्तूंची गरज लागते. यामध्ये हळद, कूंकू, अष्टगंध ते वाती आणि कापसाचे वस्त्र या सगळ्या गोष्टींची गरज भासते. प्रसन्न ऑटिझम सेंटरमधली ही मुलं गेल्या काही महिन्यांपासूनच असा बटवा बनवत आहेत. या वस्तूंमध्ये पूजेसाठी आवश्यक असणारे सगळे घटक असतील.
या बटव्यात हळद, कूंकू, बुक्का, गुलाल, अष्टगंध, अत्तर, धुपकांडी, वाती, फुलवाती, कापसाचे वस्त्र, कापूर वडी, सुपाऱ्या, हळकूंड, बदाम, खारीक, जानवी जोड आणि रांगोळी या गोष्टींचा समावेश आहे. हा बटवा विक्रीसाठीही उपलब्ध आहे. पण यातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यापेक्षा या मुलांमधले कलागुण विकसित व्हावे हाच उद्देश या उपक्रमामागे आहे.
कुंकू भरण्यासाठी झीप पाकीट उघडणं ही गोष्ट आपल्याला साधारण वाटते. मात्र ऑटिस्टिक मुलांसाठी मात्र ही अनेक प्रयत्नांनी साध्य केलेली गोष्ट ठरते. त्यामुळे प्रसन्न ऑटिस्टीक सेंटरचा हा उपक्रम कौतुकाचा विषय ठरत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement