(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2022: पाऊले चालती पंढरीची वाट... दिवे घाटापासून वारीच्या खडतर प्रवासाला सुरुवात
आज दिवे घाटातून खडतर प्रवासाला निघणार आहे. तर दुसरीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी लोणी मार्गे पंढरीकडे रवाना होणार आहे.
Ashadhi Wari 2022: पुण्यातील (Pune) दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पुण्याहून निघाल्या आहेत. दोन्ही संतांच्या पालखी हडपसर रस्ता, दिवे घाटमार्गे सासवड येथे मुक्कामी असणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्काम करेल. दोन वर्षांनंतर पायी यात्रा सुरू झाल्यापासून लाखो वारकरी दोन्ही पालखीत सामील झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटातून खडतर प्रवासाला निघणार आहे.
दोन वर्षांनंतर पायी यात्रा सुरू झाल्यापासून लाखो वारकरी दोन्ही पालखीत सामील झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटातून खडतर प्रवासाला निघणार आहे. तर दुसरीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी लोणी मार्गे पंढरीकडे रवाना होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या सध्या पुण्यात मुक्कामी आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. दोन्ही पालख्यांमध्ये लाखोंच्य संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवे घाटासाठी पर्यायी मार्ग दाखवण्यात आले आहे.
पुण्यात दोन दिवस मुक्काम केलेल्या पालखींची गर्दी होती. आळंदी, देहू येथील वैष्णव मेळा आता पुणे विश्रांतीनंतर पंढरीच्या वाटेवर आहे. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले असताना काही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी व पर्स चोरून नेली.या घटनेचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. यामध्ये काही पोलीस अधिकारी, वारकरी वेशभूषेतील कर्मचारी पालखीसह फिरत होते. पुणे व पिंपरी चिंचवड पोलिसांची विविध पथके, कर्मचारी व अधिकारी गस्त घालत होते. अनेक ठिकाणी सीसीटीव्हीही लावण्यात आले होते. गस्तीदरम्यान अनेक संशयित दिसले