पुण्यात पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, दोन दिवस चावीचा शोध, नेपाळी दाम्पत्याची हादरवणारी कहाणी
Pune Crime News : विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना पुण्यात घडली आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने अघोरी पाऊल उचलले. गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे उघडकीस आला आहे.
Pune Crime News : विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना पुण्यात घडली आहे. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने अघोरी पाऊल उचलले. नराधम नवऱ्याने पत्नीला आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून 30 वर्षीय पतीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे गुप्तांगाला लावलेल्या कुलुपाची चावी दोन दिवस मिळालीच नाही. त्यामुळे डॉक्टरांनी हे कुलुप कापून काढलं. मिळालेल्या माहितीनुसार, वाकडमध्ये राहणारे हे दाम्पत्य मूळचे नेपाळमधील आहे. आरोपीचं नाव उपेंद्र हुडके असे आहे. तो मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील आहे.
पती-पत्नीमध्ये शुल्लक कारणामुळे सतत भांडणे -
नेपाळमधील हुडके दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहे. पण पती नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यांच्यामध्ये वारंवार या कारणामुळे भांडणं व्हायची. 11 मे 2024 रोजी मात्र उपेंद्र हुडके यांनी कहरच केला. रात्री दहा वाजता दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात उपेंद्र यानं पत्नीला जोरदार मारहाण केली. त्यानंतर ब्लेडने लघवीच्या जागी जखम केली. निर्दयीपणे त्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला खिळे ठोकले. पितळेचे कुलुप लावून फरार झाला. पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली.
चारित्र्यावर संशय अन् विकृतीचा कळस
पत्नीच्या चारित्र्यावर पती सतत संशय घेत असे. यातूनच त्याने विकृतीचा कळस गाठत पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा प्रकार घडलाय. पीडित महिलेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकड पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबधित पती विरुद्ध भादवी 326,506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.
कुलुपाची चावी मिळालीच नाही, मग...
मिळालेल्या माहितीनुसार, पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या पण कुलुपाची चावी मिळाली नाही. दोन दिवस पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हते. त्यामुळे पीडित महिला अतीव वेदनेने अजूनही विव्हळत होती.संबंधित प्रकरणातील पीडित महिलेच्या गुप्तांगावरील कुलपाच्या कड्या कापून ते काढण्यात आले असून पीडित महिलेवर उपचार करण्यात आले आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी काय सांगितले ?
गुप्तांगावरील कुलुप काढण्यासाठी डॉक्टरांनी सर्जरी करण्याचा प्रयत्न केला मात्र जखम आणखी चिघळण्याच्या भीतीने सर्जरी करणे देखील शक्य नसल्याने शेवटी जखमेवरील सूज उतरल्यानंतर कुलपाच्या दोन्ही कड्या कापून ते कुलूप काढण्यात आलं. या प्रकरणानंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.
वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये 11 मे रोजी पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला इजा करुन जखमी केले होते. वाकड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे पोलिसांनी सांगितलं. या प्रकारावर पोलिसांनीही संताप व्यक्त केलाय.
आणखी वाचा :