एक्स्प्लोर
Wafgaon Fort : किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न
Malhar Rao Holkar Rajyabhishek Sohla : किल्ले वाफगाव येथे श्रीमंत भूषणसिंह होळकरांच्या हस्ते महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

Malhar Rao Holkar Rajyabhishek : किल्ले वाफगाव येथे श्रीमंत भूषणसिंह होळकरांच्या हस्ते महाराजा यशवंतराव होळकरांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
1/11

दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 जानेवारी रोजी किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणूक, राजराजेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात आला.
2/11

वाफगाव ग्रामस्थांच्या हस्ते गड पूजन आणि ध्वजारोहण, मर्दानी खेळ, ऐतिहासिक वंशजांच्या हस्ते तळीभंडार, होळकर परिवार व दुर्गसंवर्धकांच्या हस्ते राज्याभिषेक असा कार्यक्रम पार पडला.
3/11

य़ावेळी मयूर सूळ लिखित 'महाराजा-ए हिंद' या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांच्या जीवनावर सागर मदने यांचे व्याख्यान झाले.शेवटी श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर व प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन तसेच रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम पार पडले.
4/11

राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली.
5/11

राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
6/11

इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे.
7/11

या पराक्रमी देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे.
8/11

अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज 250 वर्षां नंतर संवर्धित होत आहे. संवर्धनाचा एक टप्पा पूर्ण झाला आहे. किल्लाच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्यात 7 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
9/11

भूषणसिंहराजे होळकरांच्या नेतृत्त्वात 'होळकर राजपरिवारा' तर्फे राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.
10/11

किल्ल्याचे संवर्धन काम प्रगतिपथावर असल्याने किल्ल्याच्या वैभवात भर पडली आहे याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून गडाचे काम होत आहे, येत्या काळात अनेक कामे किल्ल्यामध्ये व गावात आपल्याला करायची आहेत, त्यामुळे पर्यटन वाढेल, रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न मार्गी लागतील, परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.. हाच आमचा हेतू आहे अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली.
11/11

या सोहळ्यास यशवंतराव महाराजांवर प्रेम करणारे समाज बांधव व भगिनी, भारतीय लष्करातील काही ज्येष्ठ अधिकारी व संपूर्ण देशातून अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published at : 06 Jan 2025 11:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion