PCMC Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये विकृतीचा कळस, पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून कुलूप बसवले!
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमानवीय घटना घडली आहे. पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
![PCMC Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये विकृतीचा कळस, पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून कुलूप बसवले! pimpri chinchwad crime news Pune terrible the wife s private parts-were-pierced with nails and locked 30 year old husband PCMC Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये विकृतीचा कळस, पत्नीच्या गुप्तांगाला दोन्ही बाजूने होल पाडून कुलूप बसवले!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/d1c1d6780705b4b232615809df87b9281715942949214442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीने (PCMC Crime news) कळस गाठला आहे. त्यात हत्या, खून बलात्कारापासून ते कौटुंबीक हिंसेच्या घटना सातत्त्याने समोर येत आहे. या घटना घडत असतानाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अमानवीय घटना घडली आहे.पत्नीवर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला होल पाडून कुलूप बसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीसदेखील चक्रावले आहेत
हा प्रकार ऐकून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी 30 वर्षीय आरोपी पतीला अटक करण्यात आली असून 28 वर्षीय पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 11 मे रोजी ही घटना घडली असून 16 मे ला पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. अद्याप ही तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
11 मेला रात्री पती रागात घरी आला. त्याला पत्नीवर संशय होता. याचाच राग मनात धरुन पती घरी आला आणि पत्नीला मारहाण करु लागला. त्यानंतर त्यांने घरातील ब्लेडने फिर्यादी यांच्या गुप्तांगावर वार केले. चाकू हातात घेऊन पत्नीला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने थेट ओढणीच्या साहय्याने पत्नीचे हात बांधले आणि लोखंडी खिळ्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूने होल पाहून त्यात पितळेचं कुलूप लावलं. या सगळ्याने पत्नीला गंभीर दुखापत झाली. पत्नीवर उपचार सुरु आहे.
विकृतीचा कळस
आतापर्यंत अनेक अशा अमानवीय घटना समोर आल्या आहेत. मात्र ही घटना पोलिसांनाही चक्रावून टाकणारी होती. शिवाय हा प्रकारऐकून अनेकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या घटना समाजात पतीकडून घडत असेल तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो. पत्नीला घरातली लक्ष्मी मानलं जातं मात्र याच लक्ष्मीसोबत असा अघोरी प्रकार घटत असेल तर ही विकृती येते कुठून आणि ही मानसिकता एवढी निकृष्ठ दर्जाची होते तरी कशी, असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
ही बातमी वाचा:
- Travel : रिमझिम पाऊस..निसर्गसौंदर्य अन् बेभान मन! पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'ही' ठिकाणं पाहाल, तर सगळं टेन्शन विसराल..
- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं धूमशान! पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यातही बरसणार
- Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)