(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SPPU Special Exams: SPPU च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून विशेष परीक्षा; परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी पात्र?
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.
SPPU Special Exams: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेवा योजनांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून विशेष परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेसाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या इतर गुणांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची संधी असणार आहे. विशेष परिक्षा नसल्याने याआधी अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी अडचणी येत होत्या मात्र त्याची ही अडचण समजून घेत विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.
विशेष परीक्षेसाठी कोणते विद्यार्थी पात्र?
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी.
- नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांमध्ये भाग घेणारे विद्यार्थी.
- जर CA, CS, MPSC, UPSC परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी असतील.
- इंद्रधनुष्य, आविष्कार आणि अश्वमेद या राष्ट्रीय सांस्कृतिक उत्सवांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी.
- एकाच दिवशी आणि एकाच वेळी दोन विषय असल्यास.
-CET, NET, SET, CMA, CA, MPSC, UPSC परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा एकाच दिवशी असलेले विद्यार्थी
Phdच्या फी वाढीचा आढावा घेण्यासाठी पुणे विद्यापीठाने नेमली समिती
विद्यार्थी अभ्यासकांनी पीएचडी फी वाढीच्या निर्णयाला विरोध केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) पीएचडी फी वाढीचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमली आहे. समितीच्या सूचनेनुसार शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला जाईल.
विद्यापीठाने 2019 मध्ये शुल्काची पुनर्रचना केली, ज्यामध्ये प्रवेश शुल्क आणि अभ्यासक्रम शुल्क वाढविण्यात आले. त्यानंतर फी जवळपास दुप्पट झाली. कोरोनानंतर विद्यापीठाने फी वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, विद्यार्थी अभ्यासकांनी या दरवाढीला विरोध करत ही फी वाढ अवाजवी असल्याचे सांगत आपली फी कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे फी वाढीचा आढावा घेण्यासाठी विद्यापीठाने समिती नेमण्याचा निर्णय घेतला