एक्स्प्लोर

पोर्शे कार बिघडली होती, बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी वकिलांचा भलताच युक्तिवाद, ड्रायव्हरच्या जबाबावरही शंका

Pune Porcshe Car Accident: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी नवा कांगावा करण्यात येत असल्याची शंका सध्या उपस्थित होत आहे.

पुणे : बिघाड असतानाही पोर्शे कार (Pune Porcshe Car Accident)  विशाल अग्रवालने (Vishal Agrawal)  मुलाला चालवायला परवानगी दिली, असा जबाब चालकाने पोलिसांना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल. त्यामुळेच पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

 पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशल अग्रवालसह तिघांना काल न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीत कोठडी सुनावली आले.विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद केला. विशाल अग्रवाल यांचा बचाव करताना आलिशान पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. युक्तिवाद करताना विशाल अग्ररवाल यांचे वकील म्हणाले, अपघातापूर्वीत कारमध्ये बिघाड असल्याचे विशाल अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. या बिघाडासंदर्भात त्यांनी कंपनीशी देखील संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विशाल अग्रवाल यांनी ग्राहत तक्रार निवाारण आयोगात तक्रार केली होती.

बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल?

आता एकीकडे कारमध्ये बिघाड असल्याचा युक्तीवाद विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी केला. तर दुसरीकडे विशाल अग्रवाल यांच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरने मुलाने कार चालवायला मागितली तर त्याला चालवायला दे, तू मात्र त्याच्या बाजूला बस, अशी सूचना अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिल्याचे ड्रायव्हर सांगत आहे. वकिलांची  आणि ड्रायव्हरची दोन्ही वक्तव्ये ही विरोधाभासी वाटतात. कारण जर कारमध्ये बिघाड होता तर ती कार आपल्याा पोटच्या मुलाला चालवण्यासाठी कोणते वडिल देतील? असा सवाल सुज्ञान व्यक्तीला सध्या पडत आहे.  

 दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी नवा कांगावा

अगोदरच पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून (Pune Porsche Car Accident)  कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांच्या (Pune Police) या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यात 15 तासात जामीनावर तो बाहेर आला. पुण्यात दारुड्या पोरानं दोघांचे बळी घेतल्याच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. सोशल मिडीयावर पोलिसांवर यथेच्छ टीका होतेय. अल्पवयीने मुलाचा ब्लड रिपोर्ट सध्या मोठ्या कुतूहलाचा विषयच आहे, त्यात आता  वकिलांचा युक्तीवाद आणि ड्रायव्हरचा जबाब पाहता  दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

Video :

हे ही वाचा :

नेहमी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का, त्यांचा अग्रवाल कुटुंबांशी संबंध आहे का? : नितेश राणे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget