Ajit Pawar Pune: कंत्राटी भरतीने नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला; अजित पवारांची टीका
राज्यातील कंत्राटी भरतीबाबत बेरोजगार तरुणांमध्ये त्यांच्या नोकऱ्या जाणार, अशा पद्धतीचा गैरसमज अकारण पसरवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Pune : राज्यातील कंत्राटी भरतीबाबत बेरोजगार तरुणांमध्ये (Job Recruitment) त्यांच्या नोकऱ्या जाणार, अशा पद्धतीचा गैरसमज विनाकारण पसरवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Pune) यांनी म्हटलं आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याधी कुणाच्या काळात कशा पद्धतीने नोकर भरती झाली याविषयी काल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून वस्तुस्थिती समोर आली आहे. आपल्या सरकारच्या काळात दीड लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी एवढ्या मोठ्या लवकर भरती कोणत्याच सरकारच्या काळात झाली नसल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय.
पालकमंत्री झाल्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी कामाचा धडाका लावला आहे. आधी बैठकांचं सत्र आता आता अजित पवार पुण्यात ऑनफिल्ड कामाची पाहणी करताना दिसत आहे. विकास कामांची पाहणी करण्यासाठी त्यांनी खास सकाळची वेळ निवडली आहे. विकास कामांची पाहणी करण्यासाठी सकाळची वेळ का निवडतात याची कारणंही त्यांनी स्पष्ट केली आहेत. सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक नसते. शिवाय माझ्या आणि अधिकाऱ्यांच्या कॅन्वॉयमुळे ट्रॅफिक थांबवलं जात नाही. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सकाळी ऑनफिल्ड कामाची पाहणी करत असल्याचं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी वडगाव शेरी मतदार संघात महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कामांची आज पाहणी केली. येरवड्यात नदीसुधार योजना तसेच खराडी मध्ये ऑक्सिजन पार्क आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम सुरू आहे. अजित पवार नेहमीच्या सकाळी 6.30 वाजताच त्याठिकाणी पोहोचले आणि कामांचा आढावा घेतला. कुठलाही प्रकल्प किंवा विकास काम करत असताना त्याच्या दोन्ही बाजू समजावून घेतल्या पाहिजे. त्याबाबतचा निर्णय जनतेवर लादला गेलाय, असं जनतेला वाटायला नको असं ते यावेळी म्हणाले.
बैठका अन् विकास कामांच्या पाहणीचा धडाका...
कालही अजित पवार यांनी दिवसभर पुण्यातील विविध विभागांच्या बैठकीचा धडाका लावला होता. काल सकाळी पुण्यात 7 वाजल्यापासून बैठका सुरू झाल्या होत्या. मात्र या बैठकीसाठी अजित पवार अधिकाऱ्यांच्या अर्धा तास आधीच पोहचले होते. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. आजही अजित पवार सकाळीच ऑनफिल्ड दिसून आले.
इतर महत्वाची माहिती-